YouTube (Photo Credits: Getty Imgaes)

भारतामध्ये तुम्ही युट्युब ला आता पैसे कमवण्याचं एक साधन म्हणून पाहत असाल तर जरा थांबा. कारण आता अमेरिकेच्या बाहेरील युट्युबर्सना युट्युब व्हिडिओच्या व्ह्यूजमधून मिळणार्‍या पैशांवर टॅक्स मोजावा लागणार आहे. नुकत्याच या नव्या नियमांबाबत एक इमेल पाठवण्यात आला आहे. हा कर जून 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. दरम्यान यामधून अमेरिकेच्या युट्युबर्सना वगळण्यात आले आहे.

Gadgets Now च्या माहितीनुसार, येत्या काही आठवड्यात गूगल अ‍ॅडसेन्स मध्ये टॅक्स बाबत काही माहिती विचारली जाणार आहे. 31 मे 2021 पर्यंत तुम्ही टॅक्सची माहिती पूर्ण भरलेली नसेल तर तुमच्या महिन्याच्या कमाईमधून 24% रक्कम कापली जाऊ शकते. तुम्ही संपूर्ण माहिती दिली तर तुम्हाला अमेरिकेबाहेरील दर्शकांसाठी कर भरावा लागणार नाही किंवा त्या पैशांवर कोणताही कर आकारला जाणार नाही.

दरम्यान युट्युबर्सनी टॅक्स इन्फो जमा केली केली आणि ते कराराच्या फायद्यांसाठी पात्र असतील तर अशा युट्युबर्सना अमेरिकन दर्शकांसाठी 15 टक्के कर भरावा लागणार आहे. तर जे कराराच्या फायद्यांसाठी पात्र नसतील त्यांना 30% टॅक्स भरावा लागेल. हा अमेरिकम दर्शकांद्वारा मिळणार्‍या कमाईवर आकारला जाणार आहे. यूट्युब प्रीमियम, सुपर चॅट, सुपर स्टिकर्स आणि चॅनेल मेंबरशिप्सचादेखील यांचादेखील त्याच्या मध्ये समावेश असणार आहे.