24 एप्रिलला लॉन्च होणार Redmi Y3 स्मार्टफोन, सेल्फी काढण्यासाठी मिळणार 34 MP कॅमेरा
Redmi Y3 (Photo Credits-Twitter)

चीन (China) स्मार्टफोन कंपनी शाओमी (Xiaomi) भारतात एप्रिल महिन्यात खास सेल्फीसाठी स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने येत्या 24 एप्रिलला Redmi Y3 स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली असून त्यामध्ये सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आाहे.

कंपनीने या स्मार्टफोनचा टीझरसुद्धा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामध्ये रेडमी नोट 7 सिरिज सारखे वॉटर ड्रॉप स्टाईल नॉच देण्यात येणार आहे. यापूर्वी कंपनीने Y सिरिजमधील दोन स्मार्टफोन- Redmi Y आणि Redmi Y2 लॉन्च केले होते. तर सेल्फी कॅमेऱ्यासाठी कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिडेंस संबंधित फिचर्स दिले आहेत. तसेच सेल्फीसह पावरफुल बॅटरीसुद्धा देण्यात आली आहे. 5.99 इंचाचा डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon 625 प्रोसेसर असणार आहे.(हेही वाचा-'Redmi Note 7 Pro' ला टक्कर देण्यासाठी 22 एप्रिलला लॉन्च होणार Realme 3 Pro स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स)

रेडमीचा हा स्मार्टफोन दोन वेरियंटमध्ये लॉन्च करण्यात येणार असून त्यामध्ये 4GB RAM आणि दुसऱ्या वेरियंटमध्ये 6GB RAM असणार आहे. तसेच गोल्ड, डार्क ग्रे, ब्लू, रोज गोल्ड आणि ब्लॅक अशा रंगामध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार असून त्याची किंमत 12 हजार रुपयापर्यंत असणार आहे.