'Redmi Note 7 Pro' ला टक्कर देण्यासाठी 22 एप्रिलला लॉन्च होणार Realme 3 Pro स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स
Realme 3 pro (Photo Credits-Twitter)

रिअयलमी कंपनीने त्यांचा नवीन मॉडेल असलेला स्मार्टफोन Realme 3 Pro येत्या 22 एप्रिल रोजी लॉन्च करणार आहे. कंपनीने गुरुवारी ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. शाओमी रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी हा स्मार्टफोन बनवण्यात आला आहे.

दिल्ली मधील एका कार्यक्रमादरम्यान कंपनी हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. तर गेमिंग स्मार्टफोनच्या दृष्टीने हा स्मार्टफोन बनवण्यात आला आहे. या स्मार्टफोनसाठी 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.(हेही वाचा-शाओमीचा स्मार्टफोन अवघ्या 17 मिनिटात फूल चार्च होणार, कंपनीची नवी टेक्नॉलॉजी)

या आठवड्यापूर्वीच कंपनीने स्मार्टफोनचे सॅम्पल मॉडेल झळकावले होते. यामध्ये एचडीआर सपोर्ट फ्रंट आणि रियर कॅमेऱ्यामध्ये देण्यात आला आहे. तर 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. परंतु रियअलमी स्मार्टफोच्या किंमती बद्दल अद्याप खुलासा करण्यात आला नसूव रेडमी नोट 7 प्रोच्या किंमती ऐवढी या स्मार्टफोनची किंमत असण्याची शक्यता आहे.