शाओमी (Xiaoomi) कंपनीने 100 वॅटच्या सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग करणाऱ्या नव्या टेक्नॉलॉजीची घोषणा केली आहे. तर या टेक्नॉलॉजीमुळे शाओमीचा स्मार्टफोन अवघ्या 17 मिनिटात चार्ज होणार आहे.
विवो कंपनीच्या वीओओसी चार्जिंगसाठी पर्याय म्हणून कंपनीने ही टेक्नॉलॉजी तयार केली आहे. तसेच रेडमी स्मार्टफोनसाठी ही टेक्नॉलॉजी प्रथम उपयोगात आणणार आहे.कंपनीने याबद्दल अधिक माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. तसेच सुपरचार्ज टर्बो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने 4000mAh ची बॅटरी फक्त 17 मिनिटात फूल चार्ज होणार आहे.(हेही वाचा-Android युजर्ससाठी Whatsapp चे नवे 'डार्क मोड' फिचर लवकरच होणार सादर; पहा काय आहे खासियत)
तर लवकरच ही टेक्नॉलॉजी लॉन्च करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तर ओप्पो वीओओसी फ्लॅस या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 3700 mAh ची बॅटरी 65 टक्के चार्ज होऊ शकते.