Android युजर्ससाठी Whatsapp चे नवे 'डार्क मोड' फिचर लवकरच होणार सादर; पहा काय आहे खासियत
WhatsApp Dark Mode (Photo Credits: Twitter)

व्हॉट्सअॅपचे (WhatsApp) एक नवे फिचर लवकरच सुरु होणार आहे. डार्क मोड (Dark Mode) असे या फिचरचे नाव असून ते लवकरच अॅनरॉईड (Android) आणि आयओएस (IOS) दोन प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. या डार्क मोड फिचरमध्ये व्हाईट दिसणारे व्हॉट्सअॅपचे बॅगग्राऊंड ब्लॅक दिसेल आणि काळ्या रंगातील शब्द पांधऱ्या रंगात दिसतील. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमुळे रात्री व्हॉट्सअॅप वापरताना डोळ्यांवर विपरीत परिणाम होण्यापासून बचाव होईल. या डार्क मोडच्या मदतीमुळे कमी ब्राईटनेसमध्ये देखील स्वच्छ, स्पष्ट आणि नीट दिसेल. (व्हॉट्सअॅप मेसेज शेड्युल करा, झोपी जा! बर्थडे शुभेच्छा देण्यासाठी रात्री 12 पर्यंत जागण्याची गरज नाही)

Wabetainfo रिपोर्टनुसार, WhatsApp ने अॅनरॉईड स्मार्टफोन्ससाठी डार्क मोडवर काम करणे सुरु केले आहे. 2.19.47 व्हर्जनमध्ये व्हॉट्सअॅपने सेटिंग्स रिडिझाईन केले आहे. आता लवकरच IOS आणि Android युजर्ससाठी हे अपडेट सादर केले जाईल.

Wabetainfo ट्विट:

सध्या ट्विटर, युट्युब वर डार्क मोडचे फिचर उपलब्ध आहे. यामुळे रात्रीच्या वेळी या सोशल साईट्स वापरताना डोळ्यांवर येणारा ताण कमी होण्यास नक्कीच मदत होते.