How to schedule WhatsApp messages | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

WhatsApp Tricks: व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुम्हला तुमच्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा वेळेवर द्यायच्या आहेत. तर, रात्री 12 वाजेपर्यंत जागत बसण्याची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त आदेश द्या आणि झोपी जा किंवा इतर कामात व्यग्र व्हा. व्हॉट्सअॅप तुमचे काम ठरल्या वेळी करेन. होय, तुम्ही व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरातला अगदी किडा जरी असला तरी, कदाचित तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या या पैलूची कदाचिती माहिती मिळाली नसेल. आता तुम्ही तुमच्या ठरल्या वेळी व्हॉट्सअॅप मेसेज शेड्यूल (Whatsapp Scheduler) करु शकता. जो तुमच्या आवडत्या व्यक्तिला ठरल्या वेळी पाठवला जाईल. तोही तुम्ही ठरवून दिलेल्या वेळेवर.

Third Party Appची घ्यावी लागेल मदत.

खरे तर, व्हॉट्सअॅपवर सध्यास्थितीला असे कोणतेच फीचर नाही की, जेनेकरुन तुम्ही तुमचा मेसेज शेड्युल करु शकाल. पण, एक हटके ट्रीक वापरुन तुम्ही व्हॉट्सअॅपवर मेसेज शेड्यूल करु शकता. त्यासाठी तुम्हाला एका त्रयस्त अॅपची (Third Party App) मदत घ्यावी लागेल. असा प्रकारचे अॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होऊ शकते. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही हे मेसेज शेड्यूल करु शकता.

Third Party App कोणती?

गुगल प्ले स्टोअरवर WhatsApp Scheduler, Do It Later, SKEDit यांसारखी एक ना अनेक अॅप उपलब्ध आहेत. जी तुम्हाला व्हॉट्सअॅप मेसेज शेड्यूल करण्यात मदत करतील. विशेष म्हणजे या अॅपच्या माध्यमातून तुम्ही केवळ टेक्स्ट मेसेजच नव्हे तर, व्हिडिओ आणि फोटोही शेड्यूल करु शकता. अशा प्रकारची अॅप घेताना फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा. या अपची अॅडव्हान्स व्हर्जन तुम्हाला घ्यावी लागतील. (हेही वाचा, WhatsApp Update : आता व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये प्रायव्हेट रिप्लाय करण्याची सोय !)

WhatsApp messages अशा पद्धतीने करा शेड्यूल

हे फीचर वापरण्यासाठी कोणतेही व्हॉट्सअॅप शेड्यूल अॅप गूगल प्लेस्टोअरच्या माध्यमातून डाऊनलोड करा. किंवा त्याची APK फाईल बेबसाईटवरुन डाऊनलोड करुन इंस्टॉल करु शकता. इंस्टॉलेशन पूर्ण होताच अॅप ओपन करा. डाव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या '+' आयकॉनवर क्लिक करा. आता व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट किंवा व्हॉट्सअॅप ग्रुप सिलेक्ट करा. आणि तुम्हाला ज्या व्यक्तिसाठी मेसेज शेड्यूल करायचा आहे तो क्रमांक निवडा. वेळ आणि तारिख सेट करा. त्यानंतर फ्रीक्वेंसी निवडा मेसेज टाईप करा. हे सर्व केल्यानंतर मेसेज शेड्युल करण्यासाठी डव्या कोपऱ्यात दिसत असलेल्य क्रिएट बटनावर क्लिक करा. आता तुमचा मेसेज शेड्युल झाला आहे. तुम्ही तुमच्या कामासाठी रिकामे झाला. दरम्यान, मेसेज शेड्युल करताना काही अडचण आल्यास हीच प्रक्रिया पुन्हा करा. अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करा. काही तांत्रिक अडचण नसल्यास तुमचा मेसेज योग्य पद्धतीने शेड्युल होऊ शकतो.