Redmi Note 7 (Photo Credits-Twitter)

शाओमी (Xiaomi) आज आपला नवा स्मार्टफोन Redmi Note 7 भारतात (India) लॉन्च करणार आहे. शाओमी कंपनीने यापूर्वी हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात चीन (China) मध्ये लॉन्च केला होता. या स्मार्टफोनसह कंपनी आपल्या सब-ब्रँड रेडमी (Redmi) स्मार्टफोनला एका वेगळ्या ब्रँडच्या रुपात लॉन्च करणार आहे. शाओमी रेडमी 7 या स्मार्टफोनसाठी 48MP असणारा दमदार कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच खास फिचर्सही या स्मार्टफोनसाठी देण्यात आले आहेत.

कंपनीचा हा प्रथमच ग्लास बॉडी देण्यात आलेला स्मार्टफोन आहे. त्यात 6.3 इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरसह 3GB/4GB आणि 3GB रॅम मध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनसाठी 4,000 mAh ची बॅटरी देण्यात आली असून त्यामुळे फास्ट चार्चजिंग होण्यास मदत होणार आहे. तसेच फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार या स्मार्टफोनसाठी स्प्लॅश प्रुफ असणार आहे. मुख्य म्हणजे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन या स्मार्टफोनच्या स्क्रिनसाठी देण्यात आले आहे.(हेही वाचा-Vivo लॉन्च करणार Vivo V15 स्मार्टफोन, कमी किंमतीत मिळवा महागड्या स्मार्टफोनचे खास फिचर्स)

रेडमी नोट 7 साठी कंपनीने त्याची किंमत 9,990 रुपयांपासून ठेवली आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरसह अँड्रॉईड 8.1 ऑरियो वरती काम करतो. त्यामुळे शाओमीच्या MIUI मधून कस्टमाईज करण्यात आला आहे. तर हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्टवरील सेलमध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.