Vivo लॉन्च करणार Vivo V15 स्मार्टफोन, कमी किंमतीत मिळवा महागड्या स्मार्टफोनचे खास फिचर्स (फोटो सौजन्य-ट्वीटर)

वीवो (Vivo) कंपनीने आपला नुकतच स्मार्टफोनचे नवं मॉडेल Vivo V15 Pro लॉन्च केले आहे. मात्र आता कंपनी अजून एक नवं स्मार्टफोनचे मॉडेल Vivo V15 लॉन्च करणार आहे. आज सोमवारी (25 फेब्रुवारी) रोजी हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

रिपोर्टनुसार, वीवो कंपनीचा हा स्मार्टफोन वीवो वी15 असणार आहे. परंतु वीवो वी15 पेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना खरेदी करता येऊ शकणार आहे. या स्मार्टफोनमध्ये पॉपअम सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 22-25 हजार रुपये असणार आहे. तर वीवो वी15 प्रो स्मार्टफोनमध्ये 6GB RAM, 128 GB Storage असून त्याची किंमत 28,990 रुपये आहे. मात्र वीवो वी15 मध्ये 6.39 इंच एलसीडी डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर, तीन रिअर कॅमेऱ्यांमध्ये 24 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल असे कॅमेरे देण्यात आले आहेत.(हेही वाचा-Vivo U1 लवकरच होणार भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)

तसेच पुढील बाजूस पॉपअम कॅमेरा देण्यात आला असून तो 32 मेगापिक्सल असणार आहे. 3700 MAH बॅटरी आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. त्याचसोबत दीर्घ प्रतिक्षेनंतर वीवो यू 1 (Vivo U1) हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. अनेक महिन्यांपासून या फोनच्या लॉन्चिंगमध्ये अडथळा येत होता. मात्र अखेर सर्व अडचणी दूर सारत कंपनीने हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे.