Vivo U1 Smartphone (Photo Credit- Twitter)

दीर्घ प्रतिक्षेनंतर वीवो यू 1 (Vivo U1) हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. अनेक महिन्यांपासून या फोनच्या लॉन्चिंगमध्ये अडथळा येत होता. मात्र अखेर सर्व अडचणी दूर सारत कंपनीने हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. लवकरच हा फोन भारतात सादर करण्यात येईल. (Samsung कंपनी लवकरच लॉन्च करणार ट्रिपल कॅमेरा असणारा स्मार्टफोन)

Vivo U1 कॅमेरा आणि बॅटरी

स्मार्टफोन डुअल रिअर कॅमेरा सेटअपसह सादर होणार आहे. यात रिअर फिंगरप्रिंट सेंसर आणि वॉटरड्रॉप नॉचचा ऑप्शन देण्यात आला आहे. यात 6.2 इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रेगन 439 प्रोसेसर आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात प्रायमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा असून याचा अपर्चर एफ/2.0 आहे. यात एफ/ 2.2 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेंसर काम करेल. विशेष म्हणजे यात 4,030 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo U1 ची किंमत

आतापर्यंत Vivo U1 चे तीन वेरिएंट बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. यात 3 जीबी रॅम+32जीबी स्टोरेज वेरिएंट ची किंमत 799 चीनी युआन म्हणजे सुमारे 8,400 रुपये आहे. 3 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 999 चीनी युआन म्हणजे सुमारे 10,500 रुपये आहे आणि 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,199 चीनी युआन म्हणजे सुमारे 12,600 रुपये असेल. हा स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होणार याची अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी लॉन्चिंग बद्दल वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.

Vivo U1 फिचर्स

Vivo U1 मध्ये डुअल सिम अनरॉईड 8.1 ओरियोवर आधारीत फनटच ओएस 4.5 वर काम करेल. याशिवाय यात 6.2 इंचाचा एचडी आणि 720x1520 पिक्सल एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

यात ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर सह 4 जीबीची रॅम देण्यात आली आहे. याचा इनबिल्ट स्टोरेज 64 जीबीचा असून मायक्रोएसडी कार्डचा मदतीने तुम्ही मेमरी 256 जीबीपर्यंत वाढवू शकता.