Samsung कंपनी लवकरच लॉन्च करणार ट्रिपल कॅमेरा असणारा स्मार्टफोन
Samsung Galaxy M30 (Photo Credits-Twitter)

सध्या विविध स्मार्टफोनच्या कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी आपले नव्या मॉडेलचे स्मार्टफोन बाजारात लॉन्च करतात. तर आता लवकरच सॅमसंग (Samsung) कंपनी शाओमीला (Xiaomi) टक्कर देण्यासाठी त्यांच नवं मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन देणार आहे.

येत्या २७ फेब्रुवारी रोजी Samsung Galaxy M30 हा स्मार्टफोन सॅमसंग कंपनी लॉन्च करणार आहे. त्यामुळे शाओमीच्या रेडमी नोट 7 ला टक्कर देणारा सॅमसंगचा हा स्मार्टफोन असणार आहे. तसेच गॅलेक्सी सिरिजमधील एम 10 आणि एम 20 हे दोन स्मार्टफोन सॅमसंगने जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च केले. (हेही वाचा-सॅमसंग कंपनी लवकरच लॉन्च करणार Galaxy A सीरिजमधील स्मार्टफोन, किंमत फक्त 10 हजार रुपयांपासुन सुरु

या स्मार्टफोनसाठी कंपनीने स्क्रीन ६.४ इंचाचा सुपर एमोलेड फुल एचडी, कॅमेरा १३. ५ आणि ५ मेगापिक्सलचे ३ रियर कॅमेरा तसेच १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, रॅम ६ जीबी,स्टोरेज ६४ जीबी, प्रोसेसर Exynos 7904 असे फीचर्स देण्यात आले आहे.  तर या स्मार्टफोनची किंमत १५ हजार रुपये ठेवली असल्याचे सांगितले जात आहे.तसेच शाओमी कंपनीसोबत ऑनर, ओप्पो एम सिरिजमधील स्मार्टफोनला सॅमसंग कंपनीचा हा स्मार्टफोन टक्कर देणारा ठरणार आहे.