प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: GSMarena.com)

शाओमी (Xiaomi) कंपनीचा Sub-Brand रेडमी यांनी गेल्या वर्षात त्यांचा प्रिमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन Redmi K20 सीरिज लॉन्च करण्यापूर्वी शिखाला परवडेल असा Redmi 7A लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमध्ये Android 9 Pie च्या आधारित MIUI 10 सह उतरवण्यात आले होते. आता या अल्ट्रा बेजेट सेग्मेंच्या स्मार्टफोनसाठी कंपनीने लेटेस्ट Android 10 वर आधारित MIUI 11 अपडेट रोलआउट केले आहे. तर मिड बजेट असणारे स्मार्टफोन जे Redmi 7A पेक्षा अधिक महागडे आहेत त्यांच्यासाठी Android 10 रोल आऊट करण्यात आलेले नाही. ऐवढेच नाही तर गेल्या वर्षात सर्वाधिक विकल्या गेलेल्या स्मार्टफोन पैकी एक Redmi Note 7 साठी सुद्धा लेटेस्ट Android अपडेट रिलीज करण्यात आलेले नाही.

रेडमी 7A साठी लेटेस्ट Android10 अपडेट बिल्ड नंबर MIUI 11.0.1.0 सह रोल आऊट केले आहे. त्याचसोबत कंपनीने नवी Android सिक्युरिटी पॅच सुद्धा रोलआऊट केला आहे. हे अपडेट सध्या चीन मधील युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र कंपनी लवकरच Redmi 7 सीरिजच्या अन्य डिव्हाईससाठी सुद्धा लेटेस्ट Android अपडेट लॉन्च करणार आहे.(Oppo कंपनीची धमाकेदार ऑफर, स्मार्टफोनवर तब्बल 12 हजार रुपयापर्यंत सूट)

शाओमीने गेल्या वर्षातच्या अखेरीस लॉन्च केलेला Redmi 8 सीरिजसाठी सुद्धा Android10 रोल आऊट करण्यात आलेले नाही. हिच परिस्थिती Redmi Note 8 यांची सुद्धा असून या वर्षाच्या पहिल्या तिमाहित सर्वाधिक विक्री करण्यात आलेल्या स्मार्टफोनची सीरिज आहे. Redmi 7A स्मार्टफोन युजर्सला हे लेटेस्ट अपडेट डाऊनलोड करायचे असल्यास त्यांनी सेटिंग्स मध्ये जाऊन Check For Update येथे नवे अपडेट मिळणार आहे. तसेच WiFi च्या माध्यमातून नवे अपडेट लगेच डाऊनलोड करता येईल असे सुद्धा सांगण्यात आले आहे.