Oppo कंपनीची धमाकेदार ऑफर, स्मार्टफोनवर तब्बल 12 हजार रुपयापर्यंत सूट
Oppo (Photo Credits: Oppo)

जर तुम्हाला ओप्पो (Oppo)  कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण फ्लिपकार्टवर (Flipkart) सध्या Oppo Fantastic Days सेल सुरु असून तो 5 जून पर्यंत कायम असणार आहे. या सेलमध्ये ओप्पो कंपनीचे ऐकापेक्षा एक असे जबरदस्त स्मार्टफोनवर तब्बल 12 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.त्याचसोबत, फ्लिपकार्टवर जून 1 ते 3 जून पर्यंत असणार आहे. या दरम्यान ICICI क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. सेलमध्ये टॅबलेट ते साउंटबार सारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर भरघोस सूट दिली जाणार आहे. तर सेलच्या वेळी ग्राहकांना अॅपल, ऑनर, सॅमसंग, लेनोवे, iBall आणि Alcatel सारख्या बेस्ट सेलिंग टॅबलेट्सची विक्री करण्यात येणार आहे. तर जाणून घ्या ओप्पो कंपनीच्या कोणत्या स्मार्टफोनवर तुम्हाला सूट देण्यात येणार आहे.(Acer Swift 3 Notebook भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)

>>ओप्पो F11 प्रो

29,990 रुपये किंमत असणारा हा स्मार्टफोन ग्राहकांना 17,9990 रुपयांत खरेदी करता येणार आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 6जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सुद्धा या स्मार्टफोनमध्ये दिला गेला आहे.

>>ओप्पो रेनो 10x जूम

सेल मध्ये ओप्पो कंपनीचा हा स्मार्टफोन 41,990 रुपयांऐवजी 38,990 रुपयांत खरेदी करता येणार आहे. प्रीपेड ऑर्डर केल्यास फोनवर 12 हजार रुपयापर्यंत सूट देण्यासह अतिरिक्त सूट सुद्धा दिली जाणार आहे. त्यामुळे फोनची किंमत 26,990 रुपये झाली आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर पेक्षा कमी आहे.

>>ओप्पो रेनो 3 प्रो

8जीबी रॅम आणि 44 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणाऱ्या या स्मार्टफोनवर 1 हजार रुपयापर्यंत सूट देण्यात येत आहे. सूट दिल्यानंतर या स्मार्टफोनची किंमत 31,990 रुपये झाली आहे.

>>ओप्पो रेनो 2

स्मार्टफोनवर सूट दिल्यानंतर ग्राहकांना 33,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 48 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा सेटअपसह येणार आहे.

>>ओप्पो F9 प्रो

फ्लिपकार्ट सेलमध्ये ओप्पोच्या या स्मार्टफोन ग्राहकांना 13,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यामध्ये 25 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. मात्र ओप्पो एफ9 प्रो स्मार्टफोनची खरी किंमत 25,990 रुपये आहे.

यापूर्वी ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) यांनी त्यांच्या सर्व सर्विस बंद केल्याची माहिती ग्राहकांना दिली होती. तसेच सर्विस बंद केल्यानंतर फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर त्यांनी कोरोना व्हायरस संबंधित जनजागृती करण्यासाठी एक महत्वाचा संदेश सुद्धा दिला होता. मात्र आता पुन्हा फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन शॉपिंग बेवसाईटवरुन ग्राहकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.