शाओमी (Xiaomi) कंपनीने आपला बाजारात नवा स्मार्टफोन Mi10S लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनसाठी खासकरुन 108 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला गेला आहे. जो शानदार फोटोग्राफासाठी मदत करणार आहे. या व्यतिरिक्त Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसवर काम करणार आहे. तसेच 12 जीबी रॅम दिला गेला असून सध्या तो चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मात्र अन्य देशातील लॉन्चिंग बद्दल कंपनीकडून घोषणा करण्यात आलेली नाही.(Redmi K40 Series: रेडमी के 40 सीरीजचा धमाका! अवघ्या पाच मिनिटात 3 लाख स्मार्टफोनची विक्री)
Xiaomi Mi 10S चीनमध्ये तीन विविध स्टोरेज मॉडेलमध्ये उपलब्ध करुन दिला गेला आहे. याच्या 8 जीबी+128 जीबी ची किंमत 3299 युआन म्हणजेच 36,965 रुपये आहे. तर 8 जीबी+256ज जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 3499 युआन म्हणजेच 39,205 रुपये आहे. तर याच्या तिसऱ्या मॉडेलची किंमत 42,570 रुपये आहे. हा स्मार्टफोन युजर्सला टाइटेनियम ब्लॅक, आइस ब्लू आणि पर्ल व्हाइट कलर ऑप्शनमध्ये मिळणार आहे.
एमआय 10एस मध्ये 2340X1080 पिक्सलची स्क्रिन रेज्यॉल्यूशनसह 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. जो प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोडेट असून यामध्ये 19:5:9 आस्पेक्ट रेश्यो आणि HDR10+ सारखे फिचर्स दिले गेले आहेत. पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 4780mAh ची बॅटरी दिली गेली असून ती 30W फास्ट चार्जिंग वायर्ड आणि 10W वायरलेस रिवर्स चार्जिंग दिला गेला आहे.(Motorola Edge+ स्मार्टफोनची किंमत झाली 10 हजार रुपयांनी कमी, युजर्सला मिळणार धमाकेदार ऑफर्स)
स्मार्टफोनच्या सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिले गेले आहे. फोन अॅन्ड्रॉइड 11 ओएसवर आधारित आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. फोनचा प्रायमरी सेंसर 108MP असून 13MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP चा मॅक्रो सेंसर आणि 2MP चा डेप्थ सेंसर आहे. फोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. ज्याच्या मदतीने व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी काढता येणार आहे.