Redmi (Photo Credit- File Photo)

शाओमीची (Xiaomi) सब ब्रॅंड कंपनी रेडमीने (Redmi) भारतीय स्मार्टफोन (Smartphone) बाजारात मोठी पसंती मिळवली आहे. शाओमीचा नवा स्मार्टफोन रेडमी के 40 सीरीजला गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आले होते. मात्र, शाओमीच्या या स्मार्टफोनने विक्रीचा आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे. पहिल्याच सेलमध्ये या सीरीजचे 3 लाख स्मार्टफोनची विक्री करण्यात झाली आहे. एवढेच नव्हेतर, अवघ्या पाच मिनिटात या स्मार्टफोनची एवढी मोठी विक्री झाली आहे, अशी माहिती शाओमी कंपनीने दिली आहे. तसेच या स्मार्टफोनचा पुढचा सेल उद्या (8 मार्च) होणार आहे.

रेडमी के 40 सीरीजचे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहे. ज्यात रेडमी के 40 (Redmi K40), रेडमी के 40 प्रो (Redmi K40 Pro) आणि रेडमी के 40 प्रो प्लस (Redmi K40 Pro+) या स्मार्टफोनचा समावेश आहे. हे देखील वाचा- Amazon Mega Home Summer Sale: 7 मार्चपर्यंत अॅमेझॉनचा मेगा होम समर सेल; AC, TV, फ्रिजसह 'या' वस्तूंवर मिळणार आकर्षक ऑफर्स

रेडमी के 40 ची किंमत

6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,999 युआन म्हणजे 22,000 रुपये आहे.

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,199 युआन म्हणजेच 24,700 रुपये आहे.

टॉप व्हेरिएंट 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,699 युआन म्हणजेच 30,300 रुपये आहे.

कंपनीने रेडमी के 40 प्रो ची किंमत-

6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2799 युआन म्हणजे 31,497 रुपये आहे.

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2999 युआन म्हणजेच 33,738 रुपये आहे.

या फोनच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजची किंमत 3299 युआन म्हणजेच 37,112 रुपये आहे.

रेडमी के 40 प्रो प्लस किंमत-

कंपनीने सिंगल व्हेरिएंटमध्ये रेडमी के 40 प्रो प्लस सादर केला आहे. त्याच्या 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज फोनची किंमत 3699 युआन इतकी आहे.

रेडमी के 40 सीरीजमधील रेडमी के 40 मध्ये 6.67 इंचाचा एमोलेड फुल एचडी + एचडीआर 10 + डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आणि 360 हर्ट्जचा टच सॅम्पलिंग रेट आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आहे. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा 48 एमपी प्राइमरी सेन्सर असून त्यात 8 एमपीचा अल्ट्रावाइड लेन्स आणि 5 एमपी मॅक्रो लेन्स आहेत. रेडमी 40 मध्ये 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 हजार 529 एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.