जर तुम्ही मोटोरोला कंपनीचा 108MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन Motorola Edge+ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे आता उत्तम संधी आहे. कारण या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे. ज्यामुळे तो आता अत्यंत कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. Motorola Edge+ भारतात गेल्या वर्षात लॉन्च करण्यात आला होता. याची खासियत म्हणजे त्याचा कॅमेरा असून फोटोग्राफीसाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते. स्मार्टफोनच्या किंमतीत कितीने कपात करण्यात आली आहे हे सांगण्यात आलेले नाही. पण नव्या किंमतीसह तो फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. तर जाणून घ्या मोटोरोला एजच्या नव्या किंमतीसह त्याचा काही फिचर्सबद्दल अधिक माहिती.
मोटोरोला एज प्लस गेल्या वर्षात भारतात 74,999 रुपयांना खरेदी करण्यात आला होता. मात्र आता हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांनी स्वस्त झाला असून तो आता 64,999 रुपयांना उपलब्ध करुन दिला गेला आहे. ही किंमत फ्लिपकार्टवर युजर्सला दिसून येणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्डचा वापर करु शकतात. त्यावर तुम्हाला 10 टक्के ऑफ मिळू शकतो. त्याचसोबत हा स्मार्टफोन नो कॉस्ट EMI वर सुद्धा खरेदी करता येणार आहे.(Redmi Note10 स्मार्टफोनला मिळणार 10MP चा कॅमेरा, कंपनीने लॉन्चिंगपूर्वी केला खुलासा)
कंपनीचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 108MP चा प्रायमरी सेंसर दिला गेला आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये 16MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि दोन कॅमेरे 8MP आणि 2MP चा आहेय व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 25MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे. तसेच फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. जी 18W TurboPower वायर्ड चार्जिंग सपोर्ट, 18W वायरसेल चार्जिंग सपोर्ट आणि 5W वायरलेस रिवर्स पॉवर शेअरिंग सपोर्टसह येणार आहे.
फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड10 ओएस वर आधारित असून तो Qualcomm Snapdragon 865 चिपसेटसह दिला गेला आहे. यामध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. जो मायक्रोएसडीच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येणार आहे.