Redmi Note10 Series (Photo Credits-Twitter)

Redmi India ने आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून Redmi Note10 कॅमेरा फिचर्स बद्दल खुलासा केला आहे. हा स्मार्टफोन येत्या 4 मार्चला अधिकृतरित्या लॉन्च केला जाणार असून या सीरिज अंतर्गत कंपनी एकत्रित तीन नवे स्मार्टफोन उतरवणार आहे. त्यामध्ये Redmi Note10, Note10 Pro आणि Redmi Note10 Pro Max स्मार्टफोनचा समावेश आहे. ही सिरिज एक्सक्लुसिव्ह ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वर उपलब्ध होणार आहे.(Xiaomi Redmi 9 Prime: शाओमी कंपनीचा 5 कॅमेरा असलेल्या बजेट स्मार्टफोन रेडमी 9 प्राईम झाला आणखी स्वस्त!)

रेडमी इंडियाने ट्विटवर एक पोस्ट शेअर त्यात अपकमिंग Redmi Note10 सीरिज मधील कॅमेऱ्या संदर्भात खुलासा केला आहे. त्यामुळे युजर्सला उत्तम फोटोग्राफीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. अशी अपेक्षा केली जात आहे की, 10MP चा कॅमेरा सेंसर या सीरिज मधील टॉप मॉडेल Redmi Note10 Pro Max मध्ये दिसून येणार आहे.

Tweet:

कंपनी स्मार्टफोन 4 मार्चला अधिकृतरित्या लॉन्च करणार आहे. या सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन उतरवले जाणार असून ते Amazon India वर उपलब्ध असणार आहेत. तसेच अॅमेझॉन इंडियावर एक मायक्रो साइट सुद्धा तयार केली असून तेथे फोनच्या लॉन्चिंग तारखेसह काही फिचर्स बद्दल सांगण्यात आले आहे.(Motorola कंपनीचा 5000mAh बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Moto E7 Power भारतात लाँच, काय आहे किंमत?)

रेडमी नोट10 सीरिज संबंधित लीक्स झालेल्या रिपोट्सनुसार, स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 700 सीरिज मध्ये उतरवला जाऊ शकतो. या सीरिजमधील तिन्ही स्मार्टफोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठ्या क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. या व्यतिरिक्त कंपनीने आधीच सांगितले आहे की, Redmi Note10 सीरिजच्या फ्रंट पॅनलवर प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे कोटिंग दिले जाणार आहे.