Motorola कंपनीचा 5000mAh बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Moto E7 Power भारतात लाँच, काय आहे किंमत?
Moto E7 Power (Photo Credits: Twitter)

मोटोरोला (Motorola) कंपनीने भारतात नवा स्मार्टफोन Moto E7 Power लाँच केला आहे. 5000mAh ची बॅटरी असलेला मोटोरोलाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 7,499 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM+64GB चे स्टोरेज असणार आहे ज्याची किंमत 8,299 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल 26 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर (Flipkart) होणार आहे. किंमतीच्या तुलनेत या स्मार्टफोनमध्ये आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हा स्मार्टफोन या किंमतीतल Realme, Xiaomi, Poco च्या स्मार्टफोन्सला तगडी टक्कर देणार आहे.

Moto E7 Power स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाची HD+ डिस्प्ले दिली आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. Tahiti Blue आणि Coral Red अशा दोन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.हेदेखील वाचा- WhatsApp New Privacy Policy 'या' तारखेपर्यंत स्वीकारावी लागणार; अॅपमध्ये दिसणार पॉलिसीबद्दल अधिक माहिती

या स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. हा फोन LPDDR4X RAM आणि 2X2 MIMO कनेक्टिव्हिटी फीचर सपोर्टसह येतो. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याशिवाय फोनमध्ये 2MP चा कॅमे-याच्या मागील बाजूस आणखी एक कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाईन दिले आहे. फोनमध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम दिले आहे. त्याचबरोबर यात Google Assistant े बटन देखील दिले आहे.