WhatsApp New Privacy Policy 'या' तारखेपर्यंत स्वीकारावी लागणार; अॅपमध्ये दिसणार पॉलिसीबद्दल अधिक माहिती
WhatsApp-Privacy-Policy (Photo Credits: File Image)

जानेवारी 2021 मध्ये व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी (New Privacy Policy) जाहीर केल्यानंतर युजर्सच्या मनात डेटा सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आपला पर्सनल डेटा फेसबुकवर शेअर होईल, याची चिंता युजर्संना वाटत होती. त्यानंतर व्हॉट्सअॅपने या पॉलिसीमधील अटींची पुर्नरचना केली आहे. येत्या आठवड्यामध्ये युजर्संना पॉलिसी समजावी यासाठी सोप्या भाषेत ती अॅपमध्येच सादर केली जाणार आहे. (व्हॉट्सअॅप मध्ये तुमचा डेटा खरंच सुरक्षित आहे का? काय सांगते अॅपची New Privacy Policy? जाणून घ्या)

"आम्ही आमची पॉलिसी सोप्या शब्दांत मांडत आहोत. यासोबतच लोकांना पडलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी स्पष्टीकरण सुद्धा देत आहोत. व्हॉट्सअॅपचा वापर चालू ठेवण्यासाठी युजर्संना ही पॉलिसी स्वीकारणे गरजेचे आहे. आम्ही युजर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधून काढून त्यांची कमीत कमी इन्फॉर्मेशन वापरण्याचा प्रयत्न करु," असे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले आहे. व्हॉट्सअॅप आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी 15 मे ला लॉन्च करणार असून तोपर्यंत ही पॉलिसी समजून घेण्यास युजर्सकडे पुष्कळ कालावधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 WhatsApp Tweet:

दरम्यान. व्हॉट्सअॅपच्या या पॉलिसी विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. यावर युजर्सची प्रायव्हसी आणि त्यांचे अधिकार जपणे ही कंपनीची जबाबदारी आहे, असे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे होते. लोकांना त्यांच्या प्रायव्हसीची खूप चिंता आहे. तुम्ही 2-3 ट्रिलियन डॉलरची कंपनी असाल. परंतु, लोकांना पैशापेक्षा त्यांची प्रायव्हसी अधिक प्रिय आहे. त्यामुळे लोकांची प्रायव्हसी जपणे गरजेचे आहे, असे सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायाधीशांनी म्हटले आहे. तसंच कोर्टाने व्हॉट्सअॅप आणि फेसबुकीच्या प्रायव्हसी पॉलिसीबद्दल एक नोटीस जारी केली आहे. (WhatsApp Upcoming Features: व्हॉट्सअॅप मध्ये युजर्संना लवकरचं मिळणार नवीन फिचर ; व्हिडिओ पाठवण्याआधी करता येणार Mute आणि Edit)

युजर्सकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे व्हॉट्सअॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसीची अंमलबजावणी तीन महिने पुढे ढकलली आहे. व्हॉट्स्ॅपच्या या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे लाखो युजर्सनी टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या अॅपला आपली पसंती दाखवली आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅपवर पाठवले जाणारे मेसेजेस हे end-to-end encrypted केले असल्यामुळे कंपनी हे मेसेजेस वाचू शकत नाही, असेही व्हॉट्सअॅपकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.