WhatsApp Privacy Policy FAQs Answered: व्हॉट्सअॅप मध्ये तुमचा डेटा खरंच सुरक्षित आहे का? काय सांगते अॅपची New Privacy Policy? जाणून घ्या
WhatsApp-Privacy-Policy-FAQs (Photo Credits: File Image)

अलिकडे व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली असून त्याबद्दल सर्व युजर्संना इन-अॅप नोटीफिकेशन मिळत आहे. व्हॉट्सअॅर आपल्या परेन्ट कंपनी फेसबुक सोबत डेटा शेअर करणार असल्याचे या अपडेटेड पॉलिसीमध्ये नमूद केले आहे. सध्या होत असलेल्या ऑनलाईन फ्रॉड्स आणि डेटा हॅकिंगमुळे बहुतांश लोकांनी व्हॉट्सअॅपला पर्यायी अॅप शोधण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, टेलिग्राम आणि सिगनल अॅप प्रचलित होत आहेत. या अपडेटेड पॉलिसीचा खरा अर्थ काय? फेसबुक सोबत कोणता डेटा शेअर करणार? युजरकडून कोणता डेटा घेणार? व्हॉट्सअॅप युजर्सचे खाजगी मेसेजेस वाचू शकतो का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर खालील माहिती तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. (WhatsApp Privacy Policy नकोशी? मग सर्व्हर वरून व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट, Messages असे करा कायमचे बंद!)

व्हॉट्सअॅप युजर्सचे प्रायव्हेट मेसेजेस आणि कॉल पाहू शकतात का?

नाही. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक युजर्सचे कोणत्याही प्रकारचे प्रायव्हेट मेसेजेस वाचत नाही किंवा युजर्सचे कॉल ऐकत नाही. व्हॉट्सअॅप वरचे मेसेजेस हे end-to-end encryption वर आधारीत आहेत. मेसेज पाठवणारा व्यक्ती आणि मेसेज रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमधील स्पेशल कि नेच हे मेसेज ओपन होऊ शकतात.

व्हॉट्सअॅप कडे युजर्सच्या कॉल आणि मेसेज लॉग सेव्ह करतो का?

तुमचे मोबाईल ऑपरेटर्स तुमच्या कॉलचा लॉग स्टोर करतात. परंतु, प्रायव्हसी आणि सिक्युरीटीच्या भीतीपोटी व्हॉट्सअॅप युजर्सचे कोणत्याही प्रकारचे लॉग सेव्ह करत नाही. (WhatsApp चे हे '9' फिचर्स Signal App मध्ये नाहीत!)

WhatsApp/Facebook तुमचे शेअर लोकेशन पाहू शकतो का?

तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमचे लोकेशन शेअर केल्यावर ते end-to-end encryption ने शेअर होते. याचा अर्थ तुम्ही आणि ज्याला लोकेशन शेअर केला आहे. या दोन व्यक्ती हे लोकेशन पाहू शकतात.

व्हॉट्सअॅप तुमचे कॉन्टॅट फेसबुक सोबत शेअर करतो का?

व्हॉट्सअॅप तुमच्या मोबाईलमधले फोन नंबर रिड करुन ते कॉन्टॅक्टस तुमच्या व्हॉट्सअॅप कॉन्टॅट लिस्टमध्ये दाखवू शकतो. परंतु, व्हॉट्सअॅप तुमचे कॉन्टॅट फेसबुकसोबत शेअर करत नाही.

WhatsApp Groups प्रायव्हेट आहेत का?

हो. व्हॉट्सअॅप ग्रुपसुद्धा end-to-end encryption वर आधारीत आहेत. त्यामुळे ग्रुप मेंबर्स व्यतिरक्त कोणीही त्या ग्रुपचे कंन्टेट पाहू शकत नाही.

WhatsApp Data कसा डाऊनलोड कराल?

व्हॉट्सअॅपकडे तुमच्या अकाऊंटची कोणती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअॅप डेटा डाऊनलोड करुन तुम्ही तपासून शकता. व्हॉट्सअॅप डेटा डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

#व्हॉट्सअॅप सेटिंग्स मधील अकाऊंट्स मध्ये जा.

# तिथे Request account info वर क्लिक करा. त्यानंतर  Request report वर टॅब करा.

तीन दिवसांनंतर तुम्हाला तुमचा डेटा डाऊनलोड करता येईल.

Disappearing Messages म्हणजे काय?

WhatsApp Disappearing Messages म्हणजे तुमच्या चॅट हिस्ट्रीमधले 7 दिवसापूर्वीचे मेसेजेस आपोआप डिलिट होतील. परंतु, यासाठी समोरील व्यक्तीने सुद्धा हे फिचर अनएबल करणे गरजेचे आहे.

वरील माहिती व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे क्लिक करुन ही माहिती तपासू शकता. यामुळे व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबद्दलच्या तुमच्या शंका दूर झालेल्या असतील, अशी आशा आहे.