लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने (WhatsApp) अलिकडेच आपली प्रायव्हसी पॉलिसी बदलली असून सर्व युजर्संना त्याबद्दल इन-अॅप नोटीफिकेशन येत आहे. व्हॉट्सअॅपच्या या पॉलिसी बदलामुळे काही युजर्स व्हॉट्सअॅपला पर्यायी अॅप शोधत आहेत. यामुळे टेलिग्राम आणि सिग्नल (Signal) अॅप प्रचलित झाले आहेत. या दोन्ही अॅप्समध्ये व्हॉट्सअॅप सारखेच फिचर्स आहेत. परंतु, व्हॉट्सअॅपमध्ये असलेले काही महत्त्वाचे आणि उपयुक्त असे फिचर्स युजर्संना ह्या अॅप्समध्ये आढळणार नाहीत. तर जाणून घेऊया सिग्नल अॅपमध्ये नसलेले पण व्हॉट्सअॅप मध्ये असलेले काही खास फिचर्स: (WhatsApp Group Chats, User Profiles गूगल सर्च रिझल्ट वर दिसत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, मात्र आता Issue सोडवल्याची व्हॉट्सअॅपची माहिती)
मेसेजेंना स्टार करण्याची परवानगी:
चॅटमध्ये हवे असलेले मेसेजेस स्टार करण्याची व्हॉट्सअॅपमध्ये परवानगी आहे. हा फिचर सिग्नल अॅपमध्ये उपलब्ध नाही.
QR कोडद्वारे कॉन्टॅट अॅड:
व्हॉट्सअॅपवर पर्सनल क्युआर कोड स्कॅन करुन कॉन्टॅट अॅड करता येतो. हा क्युआर कोड युजर्सच्या नावाच्या समोर येतो. परंतु,सिग्नल अॅपमध्ये हे फिचर नाही.
स्टेटस अपडेट्स:
सिग्नल अॅपमध्ये नसलेले अजून एक फिचर म्हणजे स्टेटस अपडेट. व्हॉट्सअॅपमध्ये युजर्संना फोटो, टेक्स, व्हिडिओ, GIF 24 तासांपर्यंत स्टेटसवर अपलोड करता येतो. हे स्टेटस तुम्ही फेसबुक स्टोरी किंवा इतर अॅप्सवर देखील शेअर करु शकता.
कस्टमाईज वॉलपेपर्स:
व्हॉट्सअॅपवर अलिकडेच लॉन्च झालेले नवे फिचर म्हणजे कस्टमाईज वॉलपेपर्स. याद्वारे तुम्ही वेगवेगळ्या चॅटसाठी वेगवेगळे वॉलपेपर अॅड करु शकता. हे फिचर तुम्हाला सिग्नल अॅपमध्ये उपलब्ध होणार नाही.
व्हॉट्सअॅप पेमेंट:
व्हॉट्सअॅपवर नव्याने अॅड झालेले फिचर म्हणजे व्हॉट्सअॅप पेमेंट. याद्वारे तुम्ही कॉन्टॅट लिस्टमधील कोणत्याही व्यक्तीसोबत पैशांची देवाण-घेवाण करु शकता.
ग्रुप कॉलिंग:
व्हॉट्सअॅपवर तुम्ही एकापेक्षा अधिक व्यक्तींना एकाच वेळी कॉलमध्ये अॅड करु शकता.
लाईव्ह लोकेशन शेअरिंग:
सिग्नल अॅपमध्ये लाईव्ह लोकेशन शेअरिंग फिचर उपलब्ध नाही. परंतु. व्हॉट्सअॅप वरुन तुम्ही रियल टाईम लोकेशन शेअर करु शकता.
कोण ऑनलाईन आहे?
व्हॉ्ट्सअॅपवर कोण ऑनलाईन आहे, हे By default दिसते. हे बंद करण्याचा कोणताही पर्याय नाही. मात्र सिग्नल अॅपमध्ये ही सुविधा नाही.
डेस्कटॉपवरील ब्राऊजर सपोर्ट:
सिग्नल अॅप आपल्या युजर्संना वेगवेगळ्या डिव्हाईसेसवर लिंक करण्यास परवानगी देतो. परंतु, हे अॅप युजर्स त्यांच्या डेस्कटॉपवरील ब्राऊजरमध्ये वापरु शकत नाहीत. तुमच्या डेस्कटॉपवर हे अॅप वापरण्यासाठी तुम्हाला सिगनल अॅपचा वेगळा प्रोग्रॅम डाऊनलोड करावा लागेल.
त्यामुळे व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून इतर अॅप्सचा विचार करण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात घ्या.