WhatsApp Privacy Policy नकोशी? मग सर्व्हर वरून व्हॉट्सअॅप अकाऊंट, Messages असे करा कायमचे बंद!
व्हॉट्स अॅप डीलीट करून अन्य काही मेसेजिंग अॅप भविष्यात वापरण्याचा विचार करत असाल तर पहा सर्वर वरून सारा डेटा कायमचा काढून टाकत नेमकं व्हॉट्स अॅपचं अकाऊंट डिलीट कसं करता येईल?
WhatsApp ने नुकतीच त्यांची टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसी अपडेट करताना ग्राहकांनी ती मान्य करावी अथवा अकाऊंट करावं असे दोन पर्याय दिले आहेत. या नव्या नियमामुळे 8 फेब्रुवारी पासून जर तुम्हांला व्हॉट्सअॅपची नवी पॉलिसी मान्य नसेल तर ते अकाऊंट बंद केले जाणार आहे. मग तुम्ही देखील या द्विधा मनस्थितीमधून जात असताना व्हॉट्स अॅप डीलीट करून अन्य काही मेसेजिंग अॅप भविष्यात वापरण्याचा विचार करत असाल तर पहा सर्वर वरून सारा डेटा कायमचा काढून टाकत नेमकं व्हॉट्स अॅपचं अकाऊंट डिलीट कसं करता येईल? WhatsApp लवकरच सादर करणार multi-device support हे नवे फिचर; पहा काय आहे खासियत.
व्हॉट्सअॅप अकाऊंट कायमचं डिलीट कसं करायचं?
- व्हॉट्सअॅपमध्येच तुम्हांला अकाऊंट डिलीट करण्याचा पर्याय आहे. व्हॉट्सअॅपच्या मते ही irreversible process आहे. म्हणजे चुकून जरी अकाऊंट डिलीट झालं असलं तरीही ते पुन्हा रिवर्ट केले जाऊ शकत नाही.
- व्हॉट्सअॅप अकाऊट डिलिट करण्यासाठी व्हॉट्सअॅप मध्येच सेटिंग> अकाऊंट>डिलीट माय अकाऊंटचा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इंटरनॅशनल फॉर्मेट सह सबमीट करून DELETE MY ACCOUNT वर टॅब करा.
- त्यानंतर तुम्हांला अकाऊंट डिलीट करण्यामागील कारण विचारलं जाईल. ड्रॉपडाऊनमधून पर्याय निवडा.
- त्यानंतर DELETE MY ACCOUNT वर टॅब करा.
एकदा तुमचं अकाऊंट डिलीट झाले की आपोआपच व्हॉट्सअॅप वरून तुमचं अकाऊंट बंद केले जाते. तुमची मेसेज हिस्ट्री काढून टाकली जाते. तुम्हांला सार्या व्हॉट्सअॅप ग्रुप वरून हटवलं जातं. तसेच गूगल ड्राईव्ह बॅकअप देखील डिलीट केले जातात. दरम्यान तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये काही महत्त्वाची माहिती असेल तर तुम्हांला बॅकअप घेता येऊ शकतो. त्यामुळे अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी तो बॅकअप घ्यायला विसरू नका.
(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2021 11:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

