WhatsApp Upcoming Features: व्हॉट्सअॅप मध्ये युजर्संना लवकरचं मिळणार नवीन फिचर ; व्हिडिओ पाठवण्याआधी करता येणार Mute आणि Edit
WhatsApp (Photo Credits: Pixabay)

WhatsApp Upcoming Features: स्मार्टफोनच्या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच एक नवीन फिचर दिसणार आहे. या आगामी वैशिष्ट्यांतर्गत, Android मोबाइल वापरकर्ते व्हिडिओ पाठविण्यापूर्वी तो Mute करू शकतात. तसेच यूजर्संना संबंधित व्हिडिओ Edit करून त्यात इमोजी लागू करण्याचा पर्यायदेखील मिळवू शकतो.

व्हॉट्सअॅपने बीटा वापरकर्त्यांसाठी आपली वैशिष्ट्ये जाहीर केली असून लवकरचं हे फिचर सामान्य यूजर्संना वापरता येणार आहेत. सध्या हे फिचर अँड्रॉइड बीटा आवृत्ती 2.21.3.13 वर स्पॉट केले गेले आहे. (वाचा - मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ला टक्कर देणार स्वदेशी इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप Sandes)

स्क्रीनशॉटवरून माहिती

व्हॉट्सअ‍ॅपच्या या आगामी फिचरची माहिती बीटा आवृत्तीच्या स्क्रीनशॉटवर देण्यात आली आहे. स्क्रीनशॉटनुसार, कोणत्याही वापरकर्त्यांना कोणताही व्हिडिओ पाठविण्यापूर्वी तो म्यूट करता येईल. यावेळी व्हिडिओ Edit करण्याचा पर्यायदेखील देण्यात येईल. युजर्स या व्हिडिओमध्ये इमोजी आणि मजकूर टाकण्यासदेखील सक्षम असतील.

व्हॉट्सअ‍ॅपचे फिचर्स ट्रॅक करणारी वेबसाइट WABetaInfo ने या संदर्भात एक स्क्रीनशॉट शेअर करत त्याबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये स्पीकरची एक प्रतिमा दिसत आहे. व्हिडिओ पाठविताना स्पीकर चिन्हावर टॅप केल्यास व्हिडिओ Mute करून पाठविला जाईल. हे फिचर सध्या फक्त बीटा आवृत्तीवर उपलब्ध आहे.