Xiaomi ने भारतात लॉन्च केला वॉइस कंट्रोल करणारा Mi Smart LED Bulb
MI Smart LED Bulb (B22) (Photo Credits-Twitter)

शाओमी (Xiaomi) कंपनीने आपल्या स्मार्ट फोन अप्लायंसेस सीरिजचे नवे प्रोडक्ट भारतात लॉन्च केले आहे. Mi Smart LED Bulb B22 कंपनीच्या पोर्टफोलिओचे नवे प्रोडक्ट असून त्याने भारता एन्ट्री केली आहे. स्मार्ट एलईडी बल्ब च्या नावाने तो उतरवला असून सामान्यपणे वापरण्यात येणाऱ्या B22 बल्ब सॉकेटमध्ये फिट होणार आहे. हा बल्ब पॉलीकार्बोनेट आणि प्लास्टिक क्लॅड अॅल्युमिनियमचे बनवले आहे. या बल्बची खासियत म्हणजे तो वॉईसने कंट्रोल करता येणार आहे.(Xiaomi ने लॉन्च केली मेड इन इंडिया असलेली Mi Power Bank 3i, ग्राहकांना 899 रुपयांत खरेदी करता येणार)

Mi Smart LED Bulb (B22) भारतात 799 रुपयांच्या किंमतीला उपलब्ध आहे. याची बॉडी सफेद रंगांची दिली असून तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा खरेदी करु शकता. तसेच हा बल्ब 9WT पॉवरसह येणार आहे. यामध्ये स्टँडर्ड B22 बेस टाइपचा वापर केला आहे. शाओमीचे असे म्हणणे आहे की, बल्ब 25 हजार तासची लाईफ देऊ शकतो. Mi Smart LED Bulb पॉलिकोर्बोनेट आणि प्लॅस्टिक क्लॅढ अॅल्युमिनियम पासून तयार करण्यात आला आहे.

कंपनीचे असे म्हणणे आहे की, हा बल्ब जवळजवळ 16 मिलियन रंग प्रोड्युस करु शकतो. तुम्ही अॅन्ड्रॉइड किंवा iOS वर सुद्धा होम पेजवर जाऊन तुमच्या आवडीचा रंग निवडू शकता. कलर टेंपरेचरच्या अॅडजेस्टमेंट रेंज 1700K आणि 6500K दरम्यान आहे. Mi Smart LED Bulb मोबाईल अॅपच्या माध्यमातून कनेक्ट होण्यासाठी वायफाय 802.11 बी/जी/एनचा वापर करणार आहे. स्मार्ट बल्ब गुगल किंवा अलेक्सा सारख्या वॉइस असिस्टंच्या माध्यमातून कंट्रोल करता येणार आहे.(Facebook Smart Glasses: फेसबूक EssilorLuxottica च्या मदतीने 2021 मध्ये लॉन्च करणार स्मार्ट ग्लासेस!)

शाओमीच्या स्मार्ट बल्ब पोर्टफोलिओमध्ये या व्यतिरिक्त दुसरे अन्य काही स्मार्ट बल्बचा सुद्धा समावेश आहे. Mi LED वाय-फाय बल्ब 10WT पॉवर रेटिंगसह आहे. यामध्ये जवळजवळ सर्व फिचर्स Mi Smart LED Bulb (B22) सारखेच आहेत.