फेसबूकचे (Facebook) सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी नव्या प्रोडक्टची घोषणा केली आहे. फेसबूक आता लवकरच त्यांचे पहिले स्मार्ट ग्लासेस (Smart Glasses) घेऊन येण्याच्या तयारीमध्ये आहे. काल खुद्द मार्क झुकरबर्ग यांनी त्याबद्दल घोषणा केली आहे. दरम्यान यासाठी फेसबूक कंपनीने EssilorLuxottica सोबत करार केला आहे. EssilorLuxottica ही कंपनी रेबान (Ray-Ban), Oakley चे ग्लासेस बनवते. आता त्यांच्या अनुभवाचा वापर करत फेसबूक स्मार्ट ग्लासेस बनवणार आहेत. दरम्यान ते पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्ये लॉन्च केले जातील.
काल (16 सप्टेंबर) व्हर्च्युअल फेसबूक कनेक्ट मध्ये मार्क झुकरबर्ग यांनी याबद्दल घोषणा केली आहे. दरम्यान,'माझ्याकडे सध्या तुम्हांला दाखवण्यासाठी कोणतेही प्रोडक्ट आता उपलब्ध नाही पण 2021 मध्ये स्मार्ट ग्लास लॉन्च करण्याचा मानस आहे. त्यासाठी मल्टी लेअर पार्टनरशिप केली आहे.' अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Facebook Connect: Introducing Oculus Quest 2, a Partnership with EssilorLuxottica and More https://t.co/iFjiJr68fc
— Facebook Newsroom (@fbnewsroom) September 16, 2020
Ray-Ban ब्रॅन्डेड हे ग्लास अद्यावत तंत्रज्ञान आणि फॅशनेबल असतील. युजर्सना त्यांच्या मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत त्याच्यामुळे अधिक प्रभावीपणे कनेक्ट होता येणार आहे. दरम्यान या ग्लासेसची अधिक माहिती, किंमत, प्रॉडक्टचं नाव हे 2021 मध्ये लॉन्च करण्यापूर्वी काही वेळ आधी सांगितलं जाणार आहे.
फेसबूक कडून त्यांच्या नव्या प्रोडक्टबद्दल अधिक विश्वास व्यक्त करण्यात आला तसेच EssilorLuxottica सारख्या कंपनीसोबत मिळून काम करण्याचा आनंद आहे. लोकांना तंत्रज्ञानाचा वापर करून नवा अनुभव देण्यासाठी आम्ही देखील उत्साही आहोत असे सांगण्यात आले आहे.
सध्या गूगल ग्लासेस, भारतामध्ये जिओ ग्लासेस उपलब्ध आहेत. यंदाच्या रिलायंस वार्षिक बैठकीत त्याची घोषणा करण्यात आली होती.