Mi Power Bank 3i (Photo Credits-Twitter)

शाओमी (Xiaomi) कंपनीने त्यांच्या एक्सेसरीज सेगमेंट मध्ये नवे डिवाइस सामील करत Mi Power Bank 3i भारतात लॉन्च केली आहे. या पॉवर बँकसाठी 10,000mAh आणि 20,000mAh या दोन वेगवेगळ्या बॅटरीच्या क्षमतेसह उतरवली आहे. ही कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर लिस्ट करण्यात आली आहे. युजर्स या दोन्ही पॉवर बँकला वेबसाईटशिवाय Amazon वर सुद्धा खरेदी करु शकणार आहेत. तर जाणून घ्या या पॉवर बँकेच्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक.(Mi 10 सीरिज मधील दोन स्मार्टफोन घेऊन येणार शाओमी, 108MP कॅमेऱ्यासह 5000mAh ची मिळणार बॅटरी)

10,000mAh Mi Power Bank 3i ची किंमत फक्त 899 रुपये आहे. हे डिवाइस मिडनाइट ब्लॅक आणि मेटॅलिक ब्लू रंगात उपलब्ध आहे. तर 20,000mAh ची क्षमता असणारी Mi Power Bank 3i ही 1499 रुपयांत खरेदी करता येणार आहे. ही फक्त सेंडस्टोन ब्लॅक रंगाच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. दोन्ही पॉवर बँक कंपनीच्या वेबसाईट mi.com आणि ई-कॉमर्स साइट Amzon.in वर आज पासून सेलसाठी उपलब्ध करुन दिली आहे.

या दोन्ही मेड इन इंडिया पॉवर बँक आहे. यामध्ये देण्यात आलेल्या फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास 20,000mAh मॉडेलमध्ये ट्रिपल पोर्ट आउटपुट दिला गेला आहे. तर 10,000mAh च्या ड्युअल पोट इनपुट सुद्धा दिला आहे. 10000mAh Mi Power Bank 3i मध्ये 18W आणि 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. याच्या मदतीने युजर्स मल्टीपल डिवाइसेसला चार्ज करता येणार आहे. तर 20,000mAh Mi Power Bank 3i मध्ये सुद्धा 18W आणि 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. पण 6.9 तास ते 6 तास वेळ लागतो.(Xiaomi चा लेटेस्ट स्मार्टफोन Redmi Note 9 Pro साठी आज सेल, ग्राहकांना मिळणार दमदार ऑफर)

Mi Power Bank 3i या दोन्ही मॉडेल्समध्ये Advance Circuit प्रोटेक्शनचे 12 लेअर दिले गेल आहेत. यामध्ये तुम्हाला Low Power Mode सुद्धा मिळणार आहे. हे दाबून Mi Band आणि Mi Bluetooth हेडसेट चार्ज केला जाऊ शकतो. दोन्ही डिवाइसमध्ये युएसबी ए पोर्ट, युएसबी टाइप सी, मायक्रो युएसबी पोर्ट आणि चार एलईडी लाइट्स सुद्धा दिले गेले आहेत.