Redmi note 9 pro (Photo Credits-Twitter)

शाओमीचा (Xiaomi)  शानदार स्मार्टफोन Redmi Note 9 Pro साठी आज फ्लॅश सेल असणार आहे. हा सेल ई-कॉमर्स साइट Amazon India वर दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. ग्राहकांना या सेलमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर दमदार ऑफर्स सुद्धा दिले जाणार आहेत. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये 5020mAh ची बॅटरी, Snapdragon 720G चिपसेट आणि चार कॅमेरे दिले जाणार आहेत. तर जाणून घ्या Redmi Note 9 Pro ची किंमत आणि यावर देण्यात येणाऱ्या ऑफर्सबद्दल.(Samsung Galaxy M51 Launched in India: सॅमसंग गॅलेक्सी एम51 स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स, किंमत आणि ऑनलाईन सेलची तारीख)

रेडमी नोट 9 प्रो स्मार्टफोन भारतीय बाजारात 4GB रॅम+64GB स्टोरेज, 4GB रॅम+128GB स्टोरेज आणि 6GB रॅम+128 जीबी स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामधील पहिल्या वेरियंटची किंमत 13,999 रुपये, दुसऱ्या 15,999 रुपये आणि तिसऱ्या वेरियंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन Aurora ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि Interstellar ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवरुन 5 टक्के डिस्काउंट आणि 150 रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट ऑफर सुद्धा दिली जाणार आहे. तसेच फोनला नो-कॉस्ट EMI वर खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत Amazon वरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Airtel चा डबल डेटा बेनिफिट्स सुद्धा मिळणार आहे. ही ऑफर एअरटेलच्या 298 रुपयांच्या आणि 398 रुपयांच्या प्लॅनसाठी उपलब्ध आहे. Amazon Prime च्या ग्राहकांना खरेदीवर 5 टक्के डिस्काउंट ही दिला जाणार आहे.

Redmi Note 9 Pro मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रिन रेज्योल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. फोनची स्क्रिन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 पासून कोटेड आहे. यामध्ये युजर्सला पॉवर बॅकअपसाठी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5020mAh बॅटरीसह येणार आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसरवर काम करणार आहे. अॅन्ड्रॉइड 10OS वर आधारित हा स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनच्या कॅमेरा सेक्शनवर नजर फिरवल्यास यामध्ये क्वाड रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी सेंसर 48MP असून 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेंसर, 5MP मॅक्रो शूटर आणि 2MP चा डेप्थ सेंसर उपलब्ध आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी आणि सेल्फी सुविधेसाठी Redmi Note 9 Pro मध्ये युजर्सला 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे.

दरम्यान, Redmi सीरिजचा लेटेस्ट स्मार्टफोन Redmi 9A नुकताच लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 6799 रुपये आहे. तसेच यामध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला असून त्याचे रेज्यॉल्यूशन 720X1600 पिक्सल आहे. या स्मार्टफोनच्या उत्तम परफॉर्मेंन्ससाठी MediaTek Helio G25 चिपसेटचा वापर केला आहे. यासाठी 2GB इंटरनल स्टोरेज दिला आहे. पण मायक्रो एसडीच्या सहाय्याने ती 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोनच्या रियरमध्ये 13MP कॅमेरा आणि फ्रंटमध्ये 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 वर आधारित MIUI12 वर काम करतो.