World’s Most Valuable Brands: जगातील टॉप-100 मौल्यवान ब्रँड्समध्ये फक्त एका भारतीय कंपनीचा समावेश; Apple चे वर्चस्व कायम (See List)
Apple (Image: PTI)

ब्रँड फायनान्सने (Brand Finance) त्यांच्या वार्षिक ग्लोबल 500 अहवालात (Global 500 Report) जगातील सर्वात मौल्यवान ब्रँडची (World’s Most Valuable Brands) यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात अॅपल, अॅमेझॉन आणि गुगलचा दबदबा आहे. टॉप 100 मध्ये फक्त एक भारतीय ब्रँड आहे. Apple एकूण $335.1 अब्ज ब्रँड मूल्यासह जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून क्रमवारीत अव्वल आहे. Apple च्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये गेल्या वर्षभरात 35% वाढ झाली आहे. 2007 पासून दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ग्लोबल 500 अहवालाच्या इतिहासात Apple ची ब्रँड व्हॅल्यू ही आतापर्यंत सर्वाधिक रेकॉर्ड केलेली ब्रँड व्हॅल्यू आहे.

जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक म्हणून अॅपलचे स्मार्टफोन मार्केटवर वर्चस्व आहे, विशेषतः यू.एस. यूएस मधील 50% पेक्षा जास्त ऑपरेटिंग स्मार्टफोन आता iPhones आहेत. अहवालानुसार, 100 सर्वात मौल्यवान ब्रँडच्या यादीत अॅपलच्या पाठोपाठ अॅमेझॉन आहे, ज्याचे ब्रँड मूल्य 37 टक्क्यांहून अधिक वाढून $ 350.3 अब्ज झाले आहे. त्यापाठोपाठ गुगल, मायक्रोसॉफ्ट, वॉलमार्ट यांचा क्रमांक लागतो.

जगातील टॉप 100 ब्रँड-

Apple

Amazon

Google

Microsoft

Walmart

Samsung Group

Facebook

ICBC

Huawei

Verizon

या यादीमध्ये टिकटॉक हा असा एक ब्रँड आहे, ज्याच्या व्हॅल्यूमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सोशल मीडिया कंपनीने तिच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये दरवर्षी 215% वाढ पाहिली, ज्यामुळे तो संपूर्ण यादीतील सर्वात वेगाने वाढणारा ब्रँड ठरला आहे. प्लॅटफॉर्मने 2019 आणि 2021 दरम्यान त्यांच्या युजर बेसमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ पहिली आहे. फक्त दोन वर्षांत तो 291.4 दशलक्ष वरून 655.9 दशलक्ष पर्यंत वाढला आहे. (हेही वाचा: Elon Musk To Become Twitter CEO: इलॉन मस्क ट्विटरचे होणार नवीन सीईओ, वापरकर्त्यांवरील आजीवन बंदी घेणार मागे)

रँकिंगमधील शीर्ष 100 ब्रँडपैकी 75 युनायटेड स्टेट्स आणि चीनमधील आहेत. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीतील 95% फक्त सहा देशांतील ब्रँड आहेत. टॉप-100 टाटा समूहाचा समावेश झाला आहे, जो एकमेव भारतीय ब्रँड आहे. त्याचे रँकिंग 78 वरून 77 वर आले आहे व ब्रँड व्हॅल्यू 12.4 टक्क्यांनी वाढली आहे. टाटा समूह हा दक्षिण आशियातील सर्वात मौल्यवान ब्रँड आहे, त्याचे ब्रँड मूल्य US$ 23.9 अब्ज आहे.