Job (Photo Credits: Twitter)

जगभरात मंदीचं सावट घोंघावण्यास सुरूवात झाली आहे. Meta, Twitter, Lyft, Fintech कडून कर्मचार्‍यांची कपात करण्यात आली आहे. पण तज्ञांच्या मते ही केवळ सुरूवात आहे. येत्या काही आठवड्यात ही टेक कंपन्यांमधिल नोकर कपात वाढत जाण्याची शक्यता आहे.

बिग टेक कंपन्यांनी गेल्या काही आठवड्यांपासून कमी-तत्कालीन कमाईची नोंद केल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून आता ही नोकरकपात च्या रूपात दिसत आहे. मंदीच्या वाढत्या धोक्यामुळे ग्राहकांना खर्च कमी करण्यास प्रवृत्त केले जात होते पण आता भविष्यात पुन्हा नव्या नोकरीच्या संधी देखील दिसू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. Columbia Business Schoolचे Associate Professor Dan Wang यांनी मांडलेल्या मताच्या आधारे, येत्या काही आठवड्यात आणि महिन्यांत, त्या कंपन्या त्यांच्या खर्चात कपात करण्याचा विचार करत आहेत.  नक्की वाचा: Facebook, Instagram Accounts Hijacked: खाते अपहरणासाठी मेटाने दोन डझनहून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले, अहवाल सांगतो .

Wang यांच्या माहितीनुसार, जेव्हा ते खर्च कमी करतात, तेव्हा सर्वप्रथम सामान्यत: कमी होतो तो लेबर कॉस्ट, जाहिरात आणि मार्केटिंगचा खर्च. जेव्हा ते नंबर पाहत असतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्या प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींचा ट्रेंड कसा आहे हे पाहत असतात. जेव्हा हे चित्रं अपेक्षेप्रमाणं नसतं तेव्हा त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कामगारांची संख्या कमी-जास्त करावी लागते.

Pandemic च्या काळामध्ये टेक कंपन्यांमद्ध्ये वाढ बघायला मिळाली होती. आता जशी स्थिती पुर्वपदावर येत आहे तसे आता टेक कंपन्यांकडून पुन्हा काही गोष्टींमध्ये सुधारणा करून, बदल करावे लागणार आहेत. नक्की वाचा: Download Twitter Archive: ट्विटर होणार बंद ? अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जुन्या ट्विट आणि प्रोफाइल डेटाचा बॅकअप करू शकता डाउनलोड .

Menlo Ventures partner Matt Murphy असं सांगतात की काहीवेळा कंपन्या मोठ्या प्रमाणात लोकांना कामावरून काढून टाकत नाहीत, परंतु त्याऐवजी नव्या नियुक्त्या कमी करतात.

जेव्हा तिसर्‍या तिमाही मधून बाहेर पडणं हे दुसर्‍या तिमाही पेक्षा कठीण होतं तेव्हा किती लोकं काम करत आहेत याचा विचार केला जातो. आता आपण अजून जास्त लोकं सामावून घेऊ शकत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर प्रत्यक्षात लोकांना कामावरून काढून टाकावे लागते.

Amazon, Meta आणि Google ची आर्थिक वर्षे 2022 च्या शेवटी किंवा 2023 च्या सुरूवातीला संपतात. ते आता त्यांच्या त्यांची आर्थिक वर्षे पूर्ण होण्यापूर्वी बॅलंस शीट काढू पाहत असतील. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचार्‍याला आता कामावरून काढून टाकले असेल आणि त्याला सहा आठवड्यांचा सर्व्हंस दिला गेला असेल, तर पहिल्या तिमाहीसाठी खर्च कमी होतो. जरी कामगारांना तीन महिन्यांप्रमाणे जास्त काळ सर्व्हंस दिले गेले तरी, त्यांचे पगार पहिल्या तिमाहीच्या समाप्तीपूर्वीच बंद होतील.