PUBG Mobile India (Photo Credits: PUBG Mobile India)

भारतामध्ये गेमर्स या आठवड्यात एका मोठ्या बातमीच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. पबजी अर्थात PlayersUnknown Battlegrounds Game त्यांच्या ऑनलाईन मोबाईल गेमच्या लॉन्चच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. कोणत्याही क्षणी त्याची घोषणा होऊ शकते. काही रिपोर्ट्सनुसार पबजी नव्या अवतारामध्ये 15 ते 19 जानेवारी दरम्यान लॉन्च होऊ शकतो. त्यामुळे आज पबजीची घोषणा होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सध्या ऑनलाईन विश्वात PUBG India Launch Date याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. मग भारतात कधीही लॉन्च होऊ शकणार्‍या या गेमबद्दल इथे घ्या सारं काही जाणून! PUBG Mobile India लवकरच होणार लॉन्च; कंपनीने शेअर केला टीझर (Watch Video).

PUBG Mobile India Launch Date

भारतामध्ये पबजी मोबाईल इंडिया पुन्हा कधी लॉन्च होणार? याबाबत मागील अनेक महिन्यांपासून चर्चा आहेत. 23 डिसेंबरच्या अपडेटनुसार, Krafton ही पबजीची मालक असणारी संस्था हा गेम पुन्हा देशात लॉन्च करत असल्याची माहिती समोर आली त्यांनी नवा कंट्री मॅनेजर देखील नेमला होता. पण त्यानंतरच केंद्रीय मंत्रालय MEITY ने दिलेल्या माहिती मध्ये अद्याप भारतामध्ये या खेळाला परवानगी नसल्याचं सांगितलं होते. या खेळाच्या ग्लोबल व्हर्जन मधील एपीके फाईल लीक झाल्या होत्या.

पबजी इंडिया व्हिडिओ

पबजी च्या आधारावर येणारा FAUG हा Fearless and United Guards गेम 26 जानेवारीला लॉन्च होणार आहे. अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वीच त्याचं अ‍ॅन्थम लॉन्च केले होते. त्यामुळे आता FAUG पूर्वी देशात पबजी लॉन्च करण्याची घाई होऊ शकते. पण जर या खेळाला परवानगीच नसेल तर हा खेळ लॉन्च ची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.