Fake WhatsApp forwards (Photo Credits: File Photo)

WhatsApp Campaign in India to Fight Fake News: फेसबुकची मालकी असलेल्या WhatsAppने भारतातील मोठ्या वृत्तपत्रांमधून पूर्ण पान जाहिराती दिल्या आहेत. WhatsAppच्या या जाहिराती भारतात पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूजना चाप लावण्याबाबत सांगत आहेत. गेल्या काही काळात WhatsAppचा वापर फेक न्यूज (Fake News) पसरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे WhatsAppने ही मोहीम हाती घेतली असून, फेक न्यूज कशा ओळखाव्यात याबाबत जाहिरातींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. तसेच, WhatsAppच्या माध्यमातून पसरवल्या जात असलेल्या फेक न्यूजला आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचेही अवाहन युजर्सना केले आहे.

तुम्ही वाचत असलेले वृत्त फेक न्यूज आहे कसे ओळखाल

जे वृत्त, संदेश वाचताना त्याचा स्त्रोत मिळत नाही. ते वाचताना तुमच्या मनात चिड, राग निर्माण होत असेल. वृत्ताबाबत कुठेही माहिती उपलब्ध होत नाही, तसेच ते वृत्त फॉर्वर्ड केलेले आहे. अशा काही गोष्टी आढळल्यास समजून जा की ते वृत्त, संदेश फेक न्यूज आहे. अनेकदा व्हिडिओ, फोटो, वृत्त, संदेश, व्हॉईस रेकॉर्डिंग आदी गोष्टींच्या माध्यमातून फेक न्यूज प्रसारीत करुन तुमची दिशाभूल केली जाऊ शकते.

इतर दुवे (स्त्रोत) तपासून खात्री करा

WhatsAppवर आलेल्या वृत्त, संदेशाबाबत ऑनलाईन सर्च, करुन किंवा विश्वासार्हता असलेली वृत्तवाहिणी, वृत्तपत्र, वेबसाईट आदींच्या माध्यमातून वृत्ताची खात्री करा. या माध्यमातून तुम्हाला समजू शकते की, ते वृत्त मूळ कसे आहे व तुम्ही वाचत असलेल्या वृत्तात काय फरक आहे. थोडा जरी संशय आला तरी विश्वासार्ह यंत्रणा, व्यक्ती आदिंच्या माध्यमातून खात्री करुन घ्या.

अफवा पसरवण्यापासून स्वत:ला रोखा

जर तुम्हाला वाटते आहे की, WhatsApp संदेश, वृत्तातील काहीही मजकूर, फोटो, प्रतिमा, व्हिडिओ, ऑडिओ फेक आहे तर अशी माहिती पुढे पाठवू नका. पहिल्यांदा कंटेंटची माहती घ्या. सत्यता तपासूनच माहिती पुढे शेअर करा. कोणत्याही प्रकारे अफवा पसरवण्यापासून स्वत:ला रोखा. भलेही एखादा संदेश तुमच्या जवळच्या व्यक्तिकडून तुम्हाला पाठवण्यात आला असला तरीही. (हेही वाचा, Public Wi-Fi वापरण्यापूर्वी सुरक्षिततेच्या 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा !)

गेले काही काळ विविध राजकीय पक्ष, धार्मिक संघटना, समाजकंटक, कट्टरपंथी विचारधारेचे लोक अशा अनेक मंडळींकडून WhatsAppच्या माध्यमातून फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. त्यातून अफवा पसरवल्या जात आहेत. या प्रकारामुळे समाजात दरी निर्माण होत असून, काही प्रकरणांमध्ये तर अनेकांना आपला प्राण हाकनाक गमवावा लागला आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी WhatsApp फेक न्यूजविरोधात मोहिम उघडली आहे.