वाय फाय (Photo Credit : Pixabay)

इंटरनेट (Internet) हा आपल्या आयुष्याचा अभिवाज्य भाग झाला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन्स, मॉल्स, हॉटेल्स अनेक ठिकाणी फ्री वाय फायची (Free Wi Fi) सुविधा उपलब्ध असते आणि अनेकदा आपण या सुविधेचा लाभ घेत असतो. मात्र अशाप्रकारच्या फ्री वाय फायचा वापर करणे अनेकदा त्रासदायक ठरु शकते. कारण पब्लिक वाय फायद्वारे तुमचा स्मार्टफोन हॅक करुन तुमची खाजगी माहिती लिक होऊ शकते.

अनेकदा हॅकर्स (hackers) वायफाय ओपन ठेवून याचा वापर खाजगी डेटा हॅक करण्यासाठी करतात. पासवर्ड नसलेल्या वायफायला तुम्ही जर डिव्हाईस कनेक्ट करत असाल तर त्याद्वारे तुमचा मॅक अॅड्रेस आणि आयपी अॅड्रेस राऊटरमध्ये रजिस्टर होतो. त्यानंतर हॅकर्स स्निफिंग टूलचा वापर करुन ट्रॅफिकला इंटरसेप्ट करतात. डेटा पॅकेट्सच्या स्वरुपामध्ये ट्रान्सफर होतो. हॅकर्सकडे अनेक प्रकारचे टूल्स असतात. त्याच्या माध्यमातून या पॅकेट्स इंटरसेप्ट करुन तुमची ब्राऊजिंग हिस्ट्री हॅकर्सला अगदी सहज कळू शकते. नेटवर्क स्निफींगच्या माध्यमातून व्हिजिबल ट्रॅफीक हॅकर्स अगदी सहज इंटरसेप्ट करु शकतात. यासाठी हॅकर्स वायरशार्क पॅकेट स्निफर टूलचा वापर करतात.

त्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी या काही टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील. यामुळे तुम्ही वायफाय राऊटरवरुन अनवॉन्टेड डिव्हाईस ब्लॉक करु शकता.

# यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरुन Fing नावाचे अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप अॅपलच्या अॅपस्टोरमध्ये देखील उपलब्ध आहे.

# हे अॅप इंस्टाल केल्यानंतर ते ओपन करा.

# होमस्क्रीनवर वायफाय कनेक्टीव्हीटी दिसेल. यात रिफ्रेश आणि सेटींग्सचे ऑप्शन्स दिलेले असतील.

# रिफ्रेशवर क्लिक केल्यावर तुम्हाला वायफायला कनेक्ट होणाऱ्या डिव्हाईसेसची लिस्ट दिसेल.

या लिस्टवरुन डिव्हाईस नेमके मोबाईल आहे की लॅपटॉप हे कळेल.

# या अॅपवरुन तुम्ही कनेक्टेड डिव्हाईसचा मॅक अॅड्रेस देखील पाहु शकता. जे डिव्हाईस राऊटरवरुन ब्लॉक करायचे आहे ते कॉपी करा. या अॅपवरुन तुम्ही वेबसाईट आणि नेटवर्कींगचे पिंग मॉनिटरिंगही करु शकता.

या सोप्या टिप्स तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हॅकींगला आळा घालण्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरतील.