WhatsApp मध्ये पुन्हा मिळाला घातक बग; ग्रुप चॅट करताना पोहोचवायचा हानी
WhatsApp | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणाऱ्या फेसबुक (Facebook) कंपनीची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) ची एक कमी (Vulnerability) पुढे आली आहे. सायबर सिक्योरिटी रिसर्चरनी मंगळवारी (17 डिसेंबर 2019) ही माहिती दिली. रिसर्चर्सनी म्हटले आहे की, ही कमी म्हणजे एक प्रकारचा बग (Bug) आहे. ज्यामुळे ग्रुप चॅट क्रॅश होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे ग्रुप चॅट क्रेश झाले की, त्यासोबत चॅट हिस्ट्री सुद्धा डिलीट केली जाते. त्यामुळे आपले व्हाट्सअॅप नव्या व्हर्जनमध्ये अपडेट करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

सायबर सिक्योरिटी फर्म चेक प्वाइंट (Check Point) ने या कमीचा शोध लावला आहे. जागतीक सायबर सुरक्षा फर्मने युजर्सच्या डिवाइसला मालिसियस(Malicious) मेसेजच्या माध्यमातन क्रॅश करण्याबाबत सांगितले आङे. सोबतच म्हटले आहे की, यामुळे गोपनियता मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सर्व सदस्यांनी पॉप्युलर मेसेजिंग अॅप अनइन्स्टॉल करुन पुन्हा इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. तसेच, पुन्हा मालिसियस मेसेज डिलिट करणे आवश्यक आहे. याशिवाय आता इतरही काही पर्यायांचा शोध सुरु आहे. व्हाट्सअॅप क्रॅश झाल्यानंतर हानी पोहोचलेल्या ग्रुप चॅट रिस्टोर करणे कठीण होऊन बसले आहे. ही समस्या लवकरच दूर करुन युजर्सना अश्वासित केले जाईल, असे व्हॉट्सअॅप कडून सांगण्यात आले आहे. (हेही वाचा, व्हॉट्सऍपमध्ये मोठा बदल; आता युजर्सला मिळणार ग्रुप इनव्हाइटसह हे 3 धमाकेदार फिचर्स)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी इंडियन कॉम्प्यूटर एमरजन्सी रिस्पॉन्स टीमने एक इशारा दिला होता. यात म्हटले होते की, अँण्ड्राइड आणि आयओएसवर व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी एक बग (Bug) च्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. हा बग (Bug) करप्ट व्हिडिओच्या माध्यमातून दूरुनच कोणत्याही स्मार्टफोनमध्ये व्हायरस प्रवेश करु शकतो.