व्हॉट्सऍपमध्ये मोठा बदल; आता युजर्सला मिळणार ग्रुप इनव्हाइटसह हे 3 धमाकेदार फिचर्स
WhatsApp | (file photo)

युसर्सला आकर्षित करण्यासाठी सातत्याने व्हॉट्सऍप (WhatsApp) सातत्याने आपल्या फिचर्समध्ये अनेक बदल घडवून आणत आहे. भारतात व्हॉट्सअपला अधिक पसंती दाखवली जात आहे. यातच व्हॉट्सअप कंपनीने आपल्या युजर्ससाठी ग्रुप इनव्हाइट फीचर (group invite), रिमाइंडर (WhatsApp Reminder), कॉल वेटिंग (Call Waiting) या 3 धमाकेदार फिचर्सचा यात समावेश केला आहे. यामुळे युजर्सच्या आनंदात आणखी भर पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नव्या 3 फीचर्सचा नेमका फायदा काय हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे.

ग्रुप इनव्हाइट फीचर –

याआधी व्हॉट्सऍपच्या युजर्सचा त्याला न विचारता कोणत्याही ग्रुपमध्ये समावेश केला जात होता. परंतु, या नव्या फीचर्समुळे अडमीनला संबधित युजर्सची परवानगी घेणे गरजेचे ठरणार आहे. यासाठी युजर्सला व्हॉट्सऍपच्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी पर्याय निवडल्यानंतर ग्रुप्स हा पर्याय निवडावा लागेल. यात युसर्सला व्हू कॅन अड मी हा पर्याय दिसेल. येथे तुम्ही Everyone, my contacts आणि

contacts except यापैकी एक पर्याय निवडू शकतात. यापैंकी युसर्सा जे योग्य वाटते त्यावर ते क्लिक करु शकतात.

व्हॉट्सऍप रिमाइंडर फीचर

व्हॉट्सऍप मध्ये आता युजर्सला आवश्यक कामांचे रिमाइंडर मिळायला सुरुवात होणार आहे. या फीचरद्वारे युजर्सला कोणतीही टास्क सेट करता येईल. या टास्कबाबत युजर्सला रिमाइंडर मिळेल. तसेच एका थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवरच महत्त्वाच्या कामाचे Reminder मिळतील. यासाठी युजर्सने स्मार्टफोनमध्ये Any.do हे ऍप असणे आवश्यक आहे. हे अ‍ॅप व्हॉट्सऍप अकाउंटशी जोडावे लागेल. तुम्ही सेट केलेले रिमाइंडर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्टला फॉरवर्ड देखील करता येणार आहे. मोबाइलमध्ये काहीही ‘टास्क क्रिएट’ केल्यास तुम्हाला रिमाइंडर हवे आहे की नाही याबाबत विचारणा केली जाईल. त्यानंतर ठरवलेल्या वेळेवर तुम्हाला WhatsApp द्वारे रिमाइंडर मिळेल. मात्र हे अ‍ॅप मोफत नाहीये, यासाठी Any.do चे प्रीमियम सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल.

कॉल वेटिंग फीचर

युसर्ज एका कॉलवर बोलत असताना त्याला दुसऱ्या कॉलचे नॉटीफिकेशन होत नव्हते. परंतु नव्या बदलनुसार, युजर्सना व्हॉट्सऍप कॉल दरम्यानच कॉल वेटिंग नोटिफिकेशन मिळणार आहे. हे फीचरचा व्हिडिओ कॉलिंगसाठी मर्यादित नसून ऑडिओ कॉलसाठीही वापर होणार आहे. महत्वाचे म्हणजे, प्ले स्टोअरवर अपडेट केल्यानंतर युजर्सला या फीचरचा आनंद घेता येणार आहे. हे देखील वाचा-.Realme X2: जबरदस्त स्टोरेज फिचर्स आणि आकर्षक डिझाईन असलेला रियलमी एक्स2 आज भारतात होणार लाँच; येथे पाहा Live Streaming

या 3 नव्या फीचरचा युजर्सच्या फोनमध्ये समावेश झाल्यानंतर त्यांचा आनंदात आणखी भर पडण्याची शक्यता कंपनीने दर्शवली आहे. तसेच नको असलेल्या ग्रुपमध्ये सामावेश करणाऱ्यांपासून सुटका होणार आहे. त्याचबरोबर युजर्सला आवश्यक कामांचे रिमाइंडर देखील मिळणार आहे.