
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक स्मार्टफोन आर्थिक संकाटाला सामोरे जावा लागले आहे. मात्र, देशात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिथिलता देण्यात सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वच स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद झोकताना दिसत आहेत. दरम्यान, रेडमी, रिअलमी, ओप्पो, सॅमसंगनंतर व्हिवो कंपनीनेदेखील त्यांचा 2 स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. व्हिवो कंपनीने व्हिवो व्हाय 20 (Vivo Y20) आणि व्हिवो व्हाय 20 आय (Vivo Y20i) हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय लॉन्च केले आहे. व्हिवो व्हाय20 हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंट या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून याची किंमत 12 हजार 990 रुपये आहे. दुसरीकडे, व्हिवो व्हाय20 आय हा फोनही 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये आला आहे. याची किंमत 11 हजार 490 रुपये आहे.
या दोन्ही फोनमध्ये मुख्य केवळ रॅमचा फरक आहे. व्हिवो व्हाय20 मध्ये 4 जीबी रॅम आहे. तर, व्हिवो व्हाय 20 आयमध्ये 3 जीबी रॅम देण्यात आला आहे. इतर सर्व फिचर सारखे आहेत. हे दोन्ही फोन अँड्रॉइडवर आधारित फन टच ओएस 10.5 वर कार्यरत असतील. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये एक 13-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आणि दोन अतिरिक्त 2 मेगापिक्सेलचे सेन्सर देण्यात आले आहेत. याशिवाय सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. कॅमेरा मोडमध्ये पोर्ट्रेट, फोटो, व्हिडिओ, पॅनोरमा, लाइव्ह फोटो, स्लो-मो आणि प्रोफेशनल मोडचा समावेश आहे. याशिवाय दोन्ही फोनमध्ये 5 हजार एमएएचची मोठी बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Samsung Galaxy Z Fold 2 फोल्डेबल फोन 1 सप्टेंबरला होऊ शकतो लाँच, काय असतील याची खास वैशिष्ट्ये?
व्हिवो व्हाय 20 हा फोन ओब्सीडियन ब्लॅक आणि डॉन व्हाइट अशा 2 तर, व्हिवो व्हाय 20 आय डॉन व्हाइट आणि नेब्युला ब्लू या 2 रंगात उपलब्ध असेल. 28 ऑगस्टपासून देशातील प्रमुख रिटेल स्टोअर्स, व्हिवो इंडिया ई-स्टोअर आणि अन्य प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे फोन उपलब्ध झाला आहे. 3 सप्टेंबरपासून सर्व पार्टनर रिटेल स्टोअर्स, व्हिवो इंडिया ई-स्टोअर आणि अन्य प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइटवर फोन खरेदी करता येईल.