Samsung Galaxy Z Fold 2 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) आपले गॅलेक्सी आणि नोट सीरिजचे एकाहून एक सरस फोन्स भारतीय बाजारात आणत आहे. सॅमसंगच्या स्मार्टफोनचा लूक फारच हटके असतो. लवकरच सॅमसंग आपला नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Samsung Galaxy Z Fold 2 असे या स्मार्टफोनचे नाव असून हा फोन 1 सप्टेंबरला लाँच केला जाऊ शकतो. Samsung Newsroom साइटवर Galaxy Unpacked Part 2 इव्हेंटचे निमंत्रण आहे. जे 1 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता ET मध्ये तर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल.

UK रिटेल साइटवर Samsung Galaxy Z Fold 2 प्री ऑर्डरसाठी लिस्ट केला गेला आहे. जिकडे याच्या किंमतीविषयी आणि शिपमेंटविषयी माहिती मिळेल. 17 सप्टेंबरपासून याची शिपमेंट सुरु होईल.  Samsung Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात इन्फिनिटी ओ डिस्प्ले पॅनल आणि अल्ट्रा थिन ग्लास प्रोटेक्शन असेल. हा फोन120 हर्टज रिफ्रेश प्रोटेक्शन रेट सह येईल. यात 4500mAh ची ड्युअल इंटेलिजेंट बॅटरी असेल. हा फोन 5G सपोर्ट सह येईल.

या फोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 7.7 इंचाची सुपर अमोल्ड फ्लेक्सिबल डिस्प्ले मिळते जी 120Hz रिफ्रेश रेट सह येतो. याची दुसरी डिस्प्ले 6.23-inch Super AMOLED आहे.

याच्या कॅमेर-याविषीय बोलायचे झाले तर, यात 64MP चा सेंसर टेलिफोटो लेन्ससह 12MP ची अल्ट्रा वाइड लेन्स मिळू शकते. यात 12MP ची वाइड अँगल लेन्सन मिळते. 10MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

अलीकडेच सॅमसंग कंपनीने Galaxy Unpacked 2020 मध्ये त्यांचा बहुप्रतिक्षित Galaxy Note 20 सीरिज अंतर्गत दोन नवे स्मार्टफोन Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra लॉन्चला ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. यासह कंपनीने या इवेंटमध्ये Galaxy Note 20 सीरिज व्यतिरिक्त Galaxy Z Fold 2 फोल्डेबल फोन, Galaxy Tab S7 आणि Galaxy Tab S7+ टॅबलेट, Galaxy Watch 3 आणि Galaxy Buds Live ईअरबड्स सुद्धा बाजारात उपलब्ध करुन दिले आहेत