Twitter कडून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या ट्विटची ओळख पटवण्यासाठी उचलले 'हे' पाऊल
Twitter | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियातील प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter) चुकीची आणि दिशाभूल करणारे ट्विट हे 'लेबल' रुपात दिसणार आहेत. यावर कंपनी जुलै महिन्यापासून काम करत होती. 2020 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीपूर्वी आणि त्यानंतर सुद्धा त्या संबंधित चुकीची माहिती देणारे 'लेबल' अद्ययावत केले गेले आहेत. लोकांमध्ये खोटी माहिती पसरवण्यापासून रोखण्यासाठी पुरेसे काम न केल्यामुळे त्या 'लेबल'वर टीका झाली.

चुकीच्या माहितीची सहज ओळख सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मंगळवारी जगभरात 'लेबल' प्रसिद्ध करण्यात आले. तज्ञांचे म्हणणे आहे की अशी 'लेबल' वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात आणि ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी 'कंटेंट मॉडरेशन'चे अधिक कठीण काम सोपे करतील. म्हणजे षड्यंत्र आणि खोटे पसरवणाऱ्या पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ हटवायचे की नाही हे ठरवणे.(Facebook समोर नवी अडचण, कंपनीवर लावण्यात आला Meta नावाची चोरी केल्याचा आरोप)

ट्विटर फक्त तीन प्रकारची चुकीच्या माहितीवर लेबल देते. जसे सत्य हे तोडून मोडून सांगणारी पोस्ट. तर निवडणूक असो किंवा कोविड19 संबंधित चुकीची माहिती देणे त्यासाठी सुद्धा लेबल लावले जाणार. यामध्ये ऑरेंज आणि रेड रंगाच्या लेबलचा वापर केला जात आहे. यापूर्वीचे लेबल हे निळ्या रंगाचे होते जे ट्विटर सारखाच होता. ट्विटरने म्हटले आहे की प्रयोगांनी दाखवले आहे की जर रंग फक्त लक्षवेधी असेल तर ते लोकांना वास्तविक ट्विट ओळखण्यास मदत करू शकते. कंपनीने सांगितले की, या 'लेबल'वर माहिती क्लिक करण्याच्या दरात 17 टक्के वाढ झाली आहे, म्हणजेच अधिक लोकांनी नवीन 'लेबल' वापरून खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या ट्विटची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, फसव्या ट्विटवर 'ऑरेंज लेबल' चिन्हांकित केले जाईल आणि गंभीरपणे चुकीची माहिती देणारे ट्विट, जसे की लसींमधून 'ऑटिझम' असल्याचा दावा करणे, 'रेड लेबल' चिन्हांकित केले जाईल. 'रेड लेबल' ट्विटला उत्तर देणे किंवा 'लाइक आणि रिट्विट' करणे शक्य होणार नाही.