Facebook समोर नवी अडचण, कंपनीवर लावण्यात आला Meta नावाची चोरी केल्याचा आरोप
फेसबुक (Photo Credits: ANI)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने (Facebook) नुकतेच आपल्या नावात बदल करत मेटा असे ठेवले आहे. मात्र आता असा आरोप लावला जात आहे की, मेटा हे नाव चोरी करण्यात आले आहे. शिकागो बेस्ड टेक फर्मच्या मते, त्यांच्या कंपनीचे नाव मेटा आहे. जे फेसबुकने खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जेव्हा फेसबुकने कंपनीला खरेदी करण्यास अयशस्वी ठरली तेव्हा त्यांनी मेटा हे नाव चोरी केले. त्यामुळे आता कंपनी त्यांच्या विरोधात कोर्टात उभी राहणार आहे. मेटा कंपनीच्या मते, फेसबुकने त्यांचे फक्त नावच चोरी नव्हे तर ते री-ब्रँन्ड करत त्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आणला आहे.

मेटा कंपनीचे फाउंडर Nate Skulic यांनी असे म्हटले की, फेसबुकला कंपनी खरेदी करता आली नाही. त्यामुळेच फेसबुकने 28 ऑक्टोंबरला मीडियाच्या आधारावर आमच्या कंपनीचे नाव मेटा खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला. त्याचसोबत फेसबुकने मेटा नाव हे री-ब्रँन्ड केले. फेसबुकने ट्रेडमार्कचे उल्लंघन करण्यासह स्वत: ला मेटा असे संबोधण्याचा निर्णय घेतला आहे. Skulic यांनी एका सार्वजनिक पत्रात असे म्हटले की, मेटा कंपनीने फेसबुकच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.(Facebook कडून नावात बदल, युजर्सला आता Meta च्या माध्यमातून कनेक्टेड राहता येणार)

Nate Skulic यांनी असे म्हटले की, फेसबुक आणि त्यांचे अधिकारी फसवे असून आमच्या प्रति नव्हे तर संपूर्ण मानवतेच्या वाईट विश्वासात काम करत आहेत. फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांनी गेल्या महिन्यात घोषणा करण्यात आली होती की, त्यांची कंपनीचे एक नाव मेटा असणार आहे. स्कुलिक यांनी असे म्हटले की, गेल्या तीन महिन्यापासून फेसबुक वकील आम्हाला आमचे नाव विक्री करण्यासाठी त्रास देत होते. आम्ही काही आधारावर त्यांच्या प्रस्तावाला स्विकार केलेले नाही. Nae Skulic यांनी असे म्हटले की, अमेरिका स्थित मेटा कंपनी फेसबुकवर त्यांच्या नावाचे उल्लंघन करण्यासाठी खटला दाखल करणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत फेसबुकचे  कोणतेही विधान केलेले नाही.