गेल्या दोन दिवसांपासून ट्वीटरवर एक वाद सुरु आहे. परंतु प्रश्न असा आहे की, ट्वीटर त्यांच्यानुसार एखादी माहिती फिल्टर करतात? तसेच त्यांच्या नियमांच्या विरोधातील अकाउंटवर ट्वीटरकडून कारावाई करण्यात येते? असे प्रश्न अमूल (Amul) कंपनीचे ट्वीटर अकाउंट बंद करण्यानंतर उपस्थितीत करण्याल आले होते. चीनच्या संबंधित एक ट्वीट केल्यानंतर अमूलचे अकाउंट Restricted झाल्याचा मेसेज आला होता. मात्र काही वेळाने हा मेसेज गायब होत अकाउंट पुन्हा सुरु करण्यात आले. ट्वीटरचे असे म्हणणे आहे की, सिक्युरिटीच्या दृष्टीने पाहिले असता त्यांची ही नेहमीचीच प्रक्रिया आहे. तर ट्वीटरने अमूल कंपनीचे अकाउंट ब्लॉक केले नसल्याचे आता स्पष्टीकरण दिले आहे. फक्त महत्वाची शहानिशा करण्यासाठी अकाउंट रिस्ट्रिक्ट करण्यात आले होते. म्हणजेच त्याचे काही फिचर्स मर्यादित होते. कंपनीच्या मते सिक्युरिटी संदर्भातील गोष्टीसाठी तसे केले होते.
कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय अमूलच्या ट्वीटर अकाउंटवर Caution अलर्ट दाखवणे हे GCMMF यांना पचले नाही. ट्वीटरवर मात्र युजर्सकडून याबाबत चर्चा सुरुच होती. त्यांनी या रिस्ट्रिक्शनला अमूलच्या त्या ट्वीटसोबत जोडले ज्यामध्ये चीनवर निशाणा साधण्यात आला होता. अमूल कंपनीचे नवे क्रिऐटिव्ह कॅम्पेन Exit The Dragon? असे होते. त्यामध्ये चीनच्या प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकण्यासंबंधित दिसून आले होते. याच संदर्भातील व्यंगचित्र 3 जूनला शेअर करण्यात आले होते.(TikTok च्या डाऊनलोड्समध्ये भारतात मागील दोन 2 महिन्यात 51% घसरण; व्यवसायाची वाट बिकट)
#Amul Twitter account blocked briefly after it posted a cartoon apparently calling for boycott of Chinese products
— Press Trust of India (@PTI_News) June 6, 2020
अमूल अकाउंट संबंधित ट्वीटरने नेहमीचाच रुटीन सेफ्टी प्रोटोकॉलचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. कंपनीचे प्रवक्ता यांनी पुढे असे म्हटले आहे की, अकाउंट्सची सुरक्षितता आणि सिक्युरिटी आमची प्राथिमकता आहे. कोणत्याही अकाउंटसोबत दुर्व्यवहार झालेला नाही. पण कधी कधी अकाउंटच्या युजर्सला सोपा reCAPTCHA प्रोसेस पूर्ण करण्यासाठी सांगितले जाते. खरंतर ही प्रोसेस अकाउंट ज्याच्या नावाने आहे त्यासाठी सोपे आहे. मात्र चुकीच्या विचाराने सुरु करण्यात आलेल्या अकाउंट युजर्ससाठी हे पूर्ण करणे मुश्किल आहे. अकाउंटच्या सुरक्षितेबाबत काही स्टेप्स पूर्ण केल्यानंतर युजर्सला त्याचे एक्सेस पुन्हा दिले जाते. अकाउंटच्या सुरक्षिततेसाठी लॉगिन वेरिफिकेशनच्या माध्यमातून असे करण्यात येत असल्याचे ट्वीटरने स्पष्ट केले आहे.