TikTok या भारतातील लोकप्रिय सोशल मीडीयावरील अॅपसमोर आता देशामध्ये व्यवसायाची पुढील वाट बिकट झाली आहे. बाईट डान्स या कंपनीच्या मालकीचं असलेले हे टिकटॉक अॅप मागील अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, आता एप्रिल आणि मार्च महिन्यात या अॅपमध्ये 51% घसरण पहायला मिळाली आहे.
रिपोर्ट्सनुसार, मार्च ते मे महिन्यात आता टिकटॉकचे डाऊनलॉड्स अॅपल आणि गूगल प्ले स्टोअर वर 35 मिलियनवरून सुमारे 17 मिलियन इतके खाली आले आहेत. सध्या भारत-चीन वाद आणि त्यावरून सामान्यांनी चिनी वस्तूंवर, अॅपवर बंदी घालण्याची घेतलेली भूमिका यामुळे टिकटॉकला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान मागील काही महिन्यांमध्ये टिकटॉक या व्हिडिओ अॅपची क्रेझ फारच वाढली आहे. त्यामध्ये दर 10 पैकी 4 फोनमध्ये तुम्हांला टिकटॉक युजर्स मिळत होते. फेब्रुवारी 2019 मध्ये सुमारे 41.6% हे भारतीय युजर्स होते.
कॅरी मिनाती या युट्युबर आणि आमीर सिद्धिकी या टिकटॉक युजरमध्ये झालेला वाद ट्रेडिंगमध्ये होता. महिलांबद्दल काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी टिक टॉकवर टीकेची झोड उठवली होती. अशामधून टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी, त्याचं रेटिंग कमी करण्यासारख्या अनेक घटना समोर आल्या. TikTok Video: मुजीबुर रहमान याचा बलात्काराला प्रोत्साहन देणारा व्हिडीओ पाहून NCW च्या रेखा शर्मा यांची केंद्र सरकारला टिकटॉक बॅन करण्याची विनंती.
सुमारे 4 मिलियन नकारात्मक कमेंट्स समोर आल्या. गुगलकडून काही कमेंट्स हटवण्यात देखील आल्या होत्या.