TikTok Video: मुजीबुर रहमान याचा बलात्काराला प्रोत्साहन देणारा व्हिडीओ पाहून NCW च्या रेखा शर्मा यांची केंद्र सरकारला टिकटॉक बॅन करण्याची विनंती
TikToker Mujibur Rehman Glorifying Rape (Photo Credits: Video Screengrab/ @TajinderBagga/ Twitter)

टिकटॉक च्या व्हायरल व्हिडीओमुळे (TikTok Viral Video) मागील काही दिवसांपासून सतत वाद निर्माण होत आहेत. परिणामी, सध्या ट्विटर वर अनेकांकडून #BanTikTokIndia असा हॅशटॅग वापरून हा ऍप बॅन करण्याची मागणी केली जातेय. अगदी अलीकडेच टिकटॉकर फैजल सिद्दीकी (Faizal Siddiqui) याचा ऍसिड अटॅक ला प्रोत्साहन देणारा एका व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) कठोर भूमिका घेऊन या क्लिपला ऍपवरून डिलिट करायला लावले होते.  हे प्रकरण संपते तोवरच आता मुजीबुर रहमान (Mujibur Rehman) या युजरचा बलात्काराला (Rape)  प्रोत्साहन देणारा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. वारंवार समोर येणाऱ्या या आक्षेपार्ह्य व्हिडीओमुळे आता राष्ट्रीय  महिला आयोगाच्या रेखा शर्मा (Rekha Sharma)  यांनी केंद्र सरकारने हे ऍप्लिकेशन पूर्णतः बॅन करावे अशी विनंती केली आहे. CarryMinti's Youtube vs Tiktok Video Removed: कॅरीमिनाटी चा व्हिडिओ युट्युबवरून हटवताच अमीर सिद्दीकीचे मजेदार मीम्स व्हायरल!

मुजीबुर रहमान याच्या व्हायरल व्हिडीओ मध्ये तो स्वतः आणि त्याचा एक मित्र बलात्कार करत असल्याचा अभिनय करत आहेत. तर एका बाजूला एका मुलीचा रडतानाचा व्हिडीओ आहे. यामध्ये रहमान आणि त्याच्या मित्राचे असंवेदनशील कृत्य दाखवणारा हा व्हिडीओ भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी रेखा शर्मा यांना टॅग करून ट्विट केला होता. यांनतर रेखा शर्मा यांनी सुद्धा एक ट्विट करत "हा ऍप तरुणांना अकार्यक्षम जीवनाकडे नेत आहे. इथे व्ह्यूज आणि फॉलोअर्स साठी तरुण वेडे होत आहेत यामुळेच या ऍपवर पूर्णतः बंदी आणावी" अशी विनंती केली आहे.

पहा व्हायरल व्हिडीओ

आमिर सिद्दीकी चा भाऊ फैजल ने TikTok वर अॅसिड हल्ल्याला केले प्रमोट, लोकांनी केली कारवाईची मागणी

रेखा शर्मा ट्विट

टिकटॉक वरून अश्लील आणि आक्षेपार्ह्य व्हिडीओज बनवण्याचा वाद हा जुनाच आहे. यापूर्वी कोर्टाने सुद्धा हा ऍप भारतात बॅन करण्याचे आदेश दिले होते, मात्र काही दिवसांनी हे बॅन हटवण्यात आले. यांनंतर टिकटॉक हा भारतात मागील वर्षी सर्वाधिक डाउनलोड केलेला ऍप ठरला होता. अलीकडे युट्युबर कॅरीमिनाटी आणि आमिर सिद्दीकी यांच्यात सुरु झालेल्या Youtube vs TikTok या वादामुळे पुन्हा एकदा टिकटॉक चर्चेत आले होते.