Amir Siddiqui and Carry Minati Funny Memes (Photo Credits: Twitter)

CarryMinti's The End Video Removed: छळणूक आणि सायबर धमकी प्रकरणी यूट्यूबने कॅरीमिनाटी चा व्हिडिओ हटवला; या पार्श्वभूमीवर अमीर सिद्दीकीचे मजेदार मीम्स व्हायरल!यूट्यूब आणि टिकटॉक या दोन्हीमधील युद्ध तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऐकलं असेल. कॅरीमिनाटी चा YouTube vs TikTok: The End हा व्हिडिओ सायबर विभागाच्या सुचनावरून YouTube ने काढून टाकला आहे. त्यामुळे बर्‍याच दर्शकांना या घटनेचा धक्का बसला आहे. कारण या व्हिडिओने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. 'कॅरीमिनाटी' हे एक भारतीय लोकप्रिय यूट्यूबर आहे. यांचे नाव 'अजय नगर' आहे. कॅरीमिनाटी यांचे 2. 6, मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत. कॅरीमिनाटी हे अव्वल भारतीय यू ट्यूबर्सच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत.

अजय नगर याने अलीकडे यूट्यूब विरुद्ध टिकटॉक रोस्ट व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओवरून टिकटॉककर अमरी सिद्दीकी, यांनी कॅरीमिनाटीच्या व्हिडिओवरून सायबर धमकावल्याचा आरोप केला होता. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर ट्विटरवर मजेदार मीम्स आणि विनोदी पोस्ट करीत आहेत. YouTube ने कॅरीमिनाटीचा व्हिडिओ काढून टाकल्यामुळे नेटिझन्सनी अमीर सिद्दीकी मजेदार मीम्स तयार केले आहेत. तसेच काहींनी मूळ व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्यासाठी कॅरीमिनाटीच्या समर्थनार्थ ट्विट केले आहेत. (हेही वाचा - लॉकडाउनच्या दरम्यान ठराविक दिवसांसाठी मुंबईतील सर्व दुकाने सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांची परवानगी, जाणून घ्या WhatsApp वर व्हायरल होणाऱ्या मेसेज मागील सत्य)

1. Amir Siddiqui RIGHT NOW

2. What? What? What?

3. He He He He He He

4. Main Bol Raha Hun

5. Aish Bas In Memers Ki Hai

6. Is Second Roast Video In The Store?

कॅरीमिनाटीचा व्हिडिओ काढण्याबद्दल आपली मते काय आहेत? हे खालील कमेंन्ट बॉक्समध्ये नक्की कळवा. युट्यूबवर सर्वात जास्त पसंत असलेला व्हिडिओ काढल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. यूट्यूब विरुद्ध टिकटॉक विवादाबद्दल तुम्हाला नेमकी काय वाटते याबद्दल तुमचं मत नक्की नोंदवा.