Fake WhatsApp message about opening of shops in Mumbai (Photo Credits: WhatsApp)

कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहे. परंतु सध्या काही स्टँडअलोन दुकाने ठराविक दिवसांसाठी मुंबईत सुरु राहणार असल्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. हा मेसेज बहुतेश जणांनी एकमेकांसोबत शेअर केला आहे. तर काही जण महाराष्ट्रात सुद्धा स्टँडअलोन दुकांनाना ती सुरु करण्याची परवानगी देण्यात आल्याचा दावा करत आहेत. व्हायरल होणाऱ्या मेसेज सोबत एक व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर आणि फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे.

मेसेज मधील टेक्स बरोबर असला तरीही तो चुकीचा संदर्भ देत शेअर केला जात आहे. व्हायरल मेसेज मागील सत्य म्हणजे, स्टँडअलोन दुकाने सुरु करण्यासाठी महाराष्ट्र किंवा मुंबईत ठरवून दिलेल्या वेळेत पनवेल पर्यंत परवानगी आहे. परंतु राज्यासाठी किंवा राजधानी शहरांसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. हा आदेश पनवेल सीटी पोलीस कॉर्पोरेशन (PCMC) यांच्या नुसार, स्टँडअलोन दुकाने नियोजित दिवसात सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.(कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान संचारबंदी 5 टप्प्यांमध्ये शिथील करणार असल्याची बातमी खोटी! जाणून या व्हायरल WhatsApp Post बद्दल PIB Fact Check ने केलेला खुलासा)

आदेशानुसार, स्टेशनरी दुकाने, जनरल दुकाने, कंत्राट संबंधित कामे सोमवार आणि शुक्रवारी सुरु होणार आहेत. ऑटोमोबाईल दुकाने, गॅरेज, सर्विस सेंटर मंगळवारी आणि शनिवारी सुरु राहणार आहेत. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स आणि इलेक्ट्रिक रिपेअरिंगची दुकाने बुधवारी आणि रविवारी सुरु राहणार आहेत. होजियारी, गारमेंट्स दुकाने गुरुवारी आणि मॉल्स, शोरुम व मार्केट कॉम्पेक्स लॉकडाउच्या काळात पूर्णपणे बंद राहणार आहेत.(Fact Check: कोरोनाबाधितांच्या देखभालीसाठी केंद्र सरकार राज्यांना प्रत्येक रुग्णामागे 3 लाख रुपये देत असल्याचा मेसेज व्हायरल, जाणून घ्या सत्यता)

नागरिकांना सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दुकाने सुरु राहतील परंतु नागरिकांनी गर्दी करु नये. त्यामुळे जर नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने तातडीने बंद करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी व्हिडिओ मेसेज मधून स्पष्ट केले आहे.

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियात काही समाजकंटकांकडून खोटे मेसेज व्हायरल करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवा आणि मेसेजना बळी पडू नये असे अवाहन करण्यात आले आहे. जर तुम्हाला कोरोनासंबंधित आणि सरकारच्या नियमांबाबत किंवा योजनेसंबंधित अधिकृत माहिती हवी असलयास त्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.