कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान संचारबंदी 5 टप्प्यांमध्ये शिथील करणार असल्याची बातमी खोटी! जाणून या व्हायरल WhatsApp Post बद्दल PIB Fact Check ने केलेला खुलासा
Police checking vehicles during lockdown (Photo Credits: PTI)

भारतामध्ये 24 मार्च पासून लॉकडाऊन सुरू आहे. आता तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन 17 मे पर्यंत आहे. पण त्यापुढे 5 टप्प्यांमध्ये लॉकडाऊन हळूहळू कमी केला जाईल असे काही व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सध्या सोशल मीडियामध्ये फिरत आहेत. 18 मे पासून त्याला सुरूवात होईल. मात्र या व्हायरल मेसेजमध्ये काही तथ्य नसल्याचा खुलासा PIB Fact Check या ट्वीटर हॅन्डलवरून याबाबत भारत सरकारने खुलासा केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप पोस्टमध्ये सरकार पुढील 3 आठवड्यांच्या काळामध्ये लॉकडाऊनमधील संचारबंदीचे नियम शिथील करेल. तीन आठवड्यांनंतर कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली नाही तर अजून शिथीलता दिली जाईल.

कोव्हिड 19 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यास पुन्हा तो भाग किंवा देश मागील टप्प्यामध्ये जाईल. पहिला टप्पा 18 मे पासून असेल तर अंतिम टप्पा 10 ऑगस्टपासून सुरू होईल. त्यापुढे तो 3 आठवडे असेल. पण भारत सरकारने ही फेक न्यूज असल्याचं सांगत असा कोणताही प्लॅन नसल्याचं म्हटलं आहे. भारतात अशाप्रकारे लॉकडाऊन हटवण्याचा रोडमॅप नसून तो इतर कोणत्यातरी देशाचा असू शकतो असे PIB Fact Check ने ट्वीट मध्ये म्हटले आहे.

PIB Fact Check ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला पहिला कोरोना व्हायरस लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर 14 एप्रिलला त्यामध्ये 19 दिवसांची वाढ करत 3 मे पर्यंत लांबवला. दरम्यान त्यानंतरही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने 17 मे पर्यंत वाढवला आणि आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीयांना संबोधित करणार आहेत. यामध्ये आता ते काय घोषणा करणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.