Fact Check: कोरोनाबाधितांच्या देखभालीसाठी केंद्र सरकार राज्यांना प्रत्येक रुग्णामागे 3 लाख रुपये देत असल्याचा मेसेज व्हायरल, जाणून घ्या सत्यता
Coronavirus | Representational, Edited Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह परिवाराची सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. तसेच रुग्णांवर दिवसरात्र वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहे. याच दरम्यान, काही समाजकंटांकडून सोशल मीडियात अफवा आणि खोटे मेसेज व्हायरल केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा मेसेजला बळी पडू नये असे आवाहन केले आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या देखभालीसाठी केंद्र सरकार राज्यांना प्रत्येक रुग्णामागे 3 लाख रुपये देत असल्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. परंतु हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

सध्याची कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घेण्यासारखी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून समाजकंटक लॉकडाउनच्या काळात नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आता सोशल मीडियात केंद्र सरकार कोरोनाबाधित रुग्णासाठी प्रत्येकी 3 लाख रुपये सरकारला देत असल्याचा श्राव्य मेजेस व्हायरल होत असून त्याला नागरिकांनी बळी पडू नये. कारण हा दावा आणि निराधार असल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आले आहे.(Fact Check: गृहमंत्री अमित शाह हाडांच्या कॅन्सरने त्रस्त आहेत? त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फेक ट्वीट मागील सत्य, घ्या जाणून)

दरम्यान, देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 59662 वर पोहचला आहे. देशाची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तर विविध राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता काही ठिकाणी लॉकडाउनचे आदेश शिथील करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला राज्यात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात पाठवले जात आहे.