युट्यूब आणि टिक-टॉक मध्ये सुरु असलेल्या भांडणात चर्चेत आलेला आमिर सिद्धीकी याचा भाऊ फैजल देखील एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. फैजल सिद्दीकी (Faizal Siddhiqui) टिकटॉकवर खूपच प्रसिद्द आहे. त्याचे 1 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अशातच त्याचा अॅसिड हल्ल्याचे प्रमोशन करणारा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अॅसिड हल्ल्याचे प्रमोशन करणा-यावर कारवाईची मागणी केली जात.
या व्हिडिओमध्ये फैजल एका महिलेवर पाणी फेकताना दिसत आहे. ज्याचे अॅसिडमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या व्हिडिओला दिल्ली भाजपचे प्रवक्ता तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी आपल्या सोशल मिडियावर शेअर करुन नॅशनल कमिशन फॉर वुमेन समोर हे प्रकरण समोर आणले आहे. ज्यानंतर NCW ने चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी हे प्रकरण पोलिस आणि टिकटॉक कंपनीमध्ये उचलून धरण्यास सांगितले आहे. CarryMinti's Youtube vs Tiktok Video Removed: युट्युबच्या छळवणूक आणि सायबर बुलिंग नियमांचं उल्लंघन सांगत कॅरीमिनाटी चा व्हिडिओ युट्युबवरून हटवताच अमीर सिद्दीकीचे मजेदार मीम्स व्हायरल!
फैजल सिद्दीकी हा टीम नवाब आणि आमिर सिद्दीकीच्या टीमचा भाग आहे. आमिरने युट्यूब आणि टिकटॉकमध्ये कोण सर्वोत्कृष्ट आहे या भांडणामुळे चर्चेत आला होता.
अजय नगर याने अलीकडे यूट्यूब विरुद्ध टिकटॉक रोस्ट व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओवरून टिकटॉक वरील आमिर सिद्दीकी याने कॅरीमिनाटीच्या व्हिडिओवरून सायबर धमकावल्याचा आरोप केला होता. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर ट्विटरवर मजेदार मीम्स आणि विनोदी पोस्ट करीत आहेत. YouTube ने कॅरीमिनाटीचा व्हिडिओ काढून टाकल्यामुळे नेटिझन्सनी आमिर सिद्दीकी मजेदार मीम्स तयार केले आहेत.