Soundcore Gaming Headset (Photo Credits-Twitter)

युएस स्थित Anker चा ऑडिओ ब्रँन्ड Soundcore यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवे गेमिंग हेडफोन्स लॉन्च केले आहेत. त्यानुसार Strike 1 आणि Strike 3 हे गेमिंग हेडफोन्स ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. हे हेडफोन्स बजेट रेंज सेगमेंट अंतर्गत उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना गेमिंगच्या दरम्यान शानदार ऑडिओ अनुभव मिळणार आहे. यामध्ये  In Game Advantage  दिले असून ते गेमिंग प्लेअर्सच्या नक्कीच पसंदीस पडतील. तर जाणून घ्या Soundcore च्या हेडफोन्सबद्दल अधिक माहिती.(Amazfit GTS 2 भारतात लॉन्च; OxygenBeats AI Engine सह काय आहेत इतर फिचर्स आणि किंमत? जाणून घ्या)

Strike 1 भारतात 2,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येणार आहेत. तर Strike 3 हे 3,999 रुपयांना उपलब्ध करुन दिले आहेत. हे दोन्ही डिवाइस ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सेलसाठी उपलब्ध असणार आहेत. या व्यतिरिक्त युजर्सला काही लिडिंग रिटेल स्टोअर्स मधून ही खरेदी करता येणार आहे. या डिवाइससाठी 18 महिन्यांची वॉरंटी दिली जाणार आहे.

Strike 1 आणि Strike 3 खासकरुन गेमर्ससाठी डिझाइन करण्यात आले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, यामध्ये युजर्सला अल्ट्रा ड्युरेबिलिटी मिळणार आहे. यामध्ये In Game Advantage  दिले आहेत. जे गेमर्सला बंदुकच्या फायरिंग ते पायांच्या आवाजासह दुश्मनावर योग्य वेळी आणि योग्य निशाणा साधण्यासारखे आवाज स्पष्ट ऐकू येता येणार आहेत युजर्स साउंड Soundcore ॲपच्या मदतीने पर्सनलाइज्ड करु शकतात. या डिवाइसमध्ये माइक दिला असून तो तुम्हाला काढता ही येणार आहे. खासियत म्हणजे IPX5 सर्टिफाइड असून ते वॉटर आणि स्वेट प्रुफ बनवतात.(Amazon Fab Phones Fest Sale 2020 सेलला 22 डिसेंबर पासून सुरुवात; Smartphones आणि Accessories वर 40% सूट)

अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास Strike 3 मध्ये वर्चुअल 7.1 सराउंड साउंड एक्सपिरियंस मिळणार आहे. या दोन्ही डिवाइसेसमध्ये डिझाइन असे आहे की, युजर्सला याचा वापर दीर्घ काळासाठीच्या गेमिंसाठी करु शकतात. हे हेडफोन्स लावल्यानंतर थकल्यासारखे ही वाटणार नाही आहे. हेडफोनचे इअपॅड अत्यंत सॉफ्ट आणि कूलिंग जेलचा वापर केला आहे. त्यामुळे त्याचा खुप वेळ वापर केला तरीही कान गरम होत नाहीत.