हुआमी (Huami) चे Amazfit GTS 2 स्मार्टफोनचे भारतीय बाजारात लॉन्चिंग झाले आहे. हे डिव्हाईस प्री-ऑर्डरसाठी भारतात उपलब्ध आहे. Amazfit च्या अधिकृत वेबसाईटवर 21 डिसेंबर पासून सेल सुरु होईल. हे स्मार्टवॉच ब्लॅक शेडमध्ये युजर्ससाठी उपलब्ध आहे. प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना या स्मार्टवॉच सोबत 1799 रुपयांचा फ्री स्ट्रॅप मिळणार आहे. हे डिव्हाईस चीन आणि ग्लोबल मार्केटमध्ये यापूर्वीच उपलब्ध झाले आहे.
Amazfit GTS 2 मध्ये 1.65 इंचाचा आयताकृती AMOLED डिस्प्ले दिला असून यामध्ये 341ppi पिक्सल डेन्सिटी दिलेली आहे. या डिव्हाईसमध्ये Always-on Display आणि customised watch faces हे फिचर्स देण्यात आले आहे.
Amazfit GTS 2 मध्ये ऑक्सिजन ब्लड लेव्हल मोजण्यासाठी OxygenBeats AI Engine देण्यात आले आहे. 24 तास हार्ट रेट ट्रॅकिंग, पर्सनल अॅक्टीव्हिटी ट्रॅकिंग, हेल्थ असिसमेंट सिस्टम, स्लिप क्वॉलिटी मॉनेटरींग आणि स्ट्रेस डिटेक्शन हे या डिव्हाईसचे काही खास फिचर्स आहेत.
या स्मार्टवॉचचा वापर करुन तुम्ही तुमचे म्युझिक हँडल करु शकता. तसेच Amazfit PowerBuds wireless headphones कनेक्ट करुन तुम्ही वॉचमधूनच म्युझिक ऐकू शकता. या डिव्हाईसमध्ये 246mAh ची बॅटरी दिली असून पॉवर सेव्हिंग मोडमध्ये 30 दिवसांपर्यंत त्याची बॅटरी कार्यरत राहू शकते.
या स्मार्टवॉचमध्ये 12 built-in स्पोर्ट्स मोड्स दिले आहेत. हे वॉच 5ATM water-resistance आहे. Amazfit GTS 2 स्मार्टवॉच 12,999 रुपयांना उपलब्ध आहे.