Amazon Fab Phones Fest Sale 2020 सेलला 22 डिसेंबर पासून सुरुवात; Smartphones आणि Accessories वर 40% सूट
Amazon Fab Phones Fest Sale 2020 (Photo Credits: Amazon India)

ख्रिसमसचा (Christmas) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने अॅमेझॉनचा (Amazon) नवा सेल Amazon Fab Phones Fest Sale 2020 सुरु होणार आहे. 22 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या सेल अंतर्गत स्मार्टफोन्स (Smartphones) आणि अॅक्सेसरीजवर (Accessories) डिस्काऊंट दिले जात आहे. अॅपल (Apple), सॅमसंग (Samsung), शाओमी (Xiaomi), वनप्लस (OnePlus) आणि इतर ब्रँडवर 40 टक्के सूट दिली जात आहे. या सेलसाठी अॅमेझॉन इंडियाने एचडीएफसी बँकेसोबत (HDFC Bank) पार्टनरशीप केली असून त्यावर 1500 रुपयांचा इंस्टन्ट डिस्काऊंट देखील दिला जात आहे. त्याचबरोबर इतर इलेक्ट्रोनिक्स प्रॉडक्सवर देखील विविध ऑफर्स आणि नो-कॉस्ट ईएमआयचा (No-Cost EMI) पर्यायही उपलब्ध आहे. (Flipkart Big Saving Days Sale ला आजपासून सुरु, iPhone 11 Pro, ROG Phone 3 सह 'या' जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट)

या सेल दरम्यान ऑफर्स उपलब्ध असलेल्या मोबाईलची यादी अॅमेझॉनकडून जारी करण्यात आली असून प्रॉडक्टवरील डिस्काऊंट नंतर जाहीर केला जाणार आहे. यामध्ये Samsung Galaxy M51, OnePlus Nord 5G, Galaxy M21, Apple iPhone 11, Redmi 9 Prime, OnePlus 8T 5G, Redmi Note 9 Pro Max, Galaxy M31 या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. (Amazon Christmas 2020 Sale Offers: ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर OnePlus8T 5G, Redmi Note 9 Pro, Mi Band 5 सह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर धमाकेदार ऑफर्स, डिस्काऊंट)

Amazon Fab Phones Fest Sale 2020 (Photo Credits: Amazon India)

तसंच रियलमी पॉवर बँक्स, हँडसेट, मोबाईल केस, कव्हर्स, केबल्स आणि चार्जर्स यांसारख्या मोबाईल अॅक्सेसरीजवरील डिस्काऊंट देखील अद्याप घोषित केलेला नाही. दरम्यान, रेडमी नोट 9 प्रो चा 4GB + 64GB हा मॉडेलवर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. 12,999 रुपयांना रेडमीचे हे वेरिएंट उपलब्ध होत आहे. तुम्हालाही स्मार्टफोन्स किंवा अॅक्सेसरीजची खरेदी करायची असेल तर ही संधी अजिबात दवडू नका.