Flipkart Big Saving Days Sale ला आजपासून सुरु, iPhone 11 Pro, ROG Phone 3 सह 'या' जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट
Flipkart Big Saving Days Sale (Photo Credits: Twitter)

दिवाळीनंतर ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर बहुप्रतिक्षित फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल (Flipkart Big Saving Days Sale) आला आहे. हा सेल आजपासून सुरु झाला असून 18 डिसेंबर ते 22 डिसेंबर हा सेल असणार आहे. या सेलमध्ये लोकप्रिय असलेल्या स्मार्टफोन्स (Smartphones) आणि आयफोन्सवर (iPhones) जबरदस्त सूट मिळत आहे. वर्षाचा सर्वात मोठा आणि शेवटचा बिग सेविंग डेज सेल सुरु झाला असल्यामुळे इच्छुकांना आपला आवडता मोबाईल घेण्यासाठी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. या सेलमध्ये SBI क्रेडिट कार्डधारकांना 10% चा त्वरित डिस्काउंट मिळत आहे. ज्यामुळे तुमची 1500 रुपयांपर्यंत बचत होईल.

या बिग सेविंग सेल मध्ये iphone 11 Pro, ROG Phone 3 सारख्या ब-याच स्मार्टफोन्सवर सूट मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ किंमतीमुळे ज्यांना आपला आवडता स्मार्टफोन वा आयफोन घेता आला नाही त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.

पाहूयात कोणते आहेत हे स्मार्टफोन्स:

1. Poco X3

यात 6GB+64GB स्टोरेज वेरियंटची किंमत 15,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर 6GB+128GB स्टोरेजची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

2. iphone 11 Pro

या आयफोनची 64GB स्टोरेजची किंमत 79,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर 512GB स्टोरेजची किंमत 1,09,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Amazon Christmas 2020 Sale Offers: ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर OnePlus8T 5G, Redmi Note 9 Pro, Mi Band 5 सह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर धमाकेदार ऑफर्स, डिस्काऊंट

3. ROG Phone 3

यातील 8GB+128GB स्टोरेजची किंमत 44,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर 12GB+128GB स्टोरेजची किंमत 47,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

4. Samsung Galaxy F41

याच्या 6GB+64GB स्टोरेजची किंमत 15,499 रुपये असून 6GB+128GB स्टोरेजची किंमत 16,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

5. Apple iPhone XR

याच्या 64GB वेरियंटची किंमत 38,999 रुपये 128GB स्टोरेजची किंमत 43,999 रुपये असणार आहे.

त्यामुळे वरील कोणता फोन घ्यायची इच्छा राहून गेली असेल तर अशा ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा अवश्य फायदा घ्यावा. 22 डिसेंबरपर्यंत हा फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल असणार आहे.