Sony कंपनीचा Xperia सीरिज युजर्समध्ये लोकप्रिय आहे. मात्र गेल्या काही काळापासून कंपनीचा हा स्मार्टफोन बाजारात दिसून येत नव्हता. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एक्सपिरिया फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून 14 एप्रिलला एक इवेंट आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक्सपिरियाचा स्मार्टफोन झळकवला जाणार आहे. असा अंदाज लावला जात आहे की, कंपनीच्या या इवेंटमध्ये एक्सपिरिया 1 III स्मार्टफोन लॉन्च करू शकते.(Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 19 एप्रिल रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता)
सोनी कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनलवर एक बॅनर झळवकण्यात आला आहे. त्यामध्ये अशी माहिती दिली गेली आहे. की, कंपनी 14 एप्रिलला जापानमध्ये एक इवेंट आयोजित करणार आहे. हा इवेंट भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरु होणार आहे. बॅनरनुसार, या इवेंटमध्ये एक्सपिरिया प्रोडक्ट्स दिसून येणार आहेत. मात्र त्याच्या नावांबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही.
समोर आलेल्या लीक्सनुसार, कंपनी 14 एप्रिलला करणाऱ्या इवेंटमध्ये Xperia1 III आणि Xperia Compact लॉन्च करु शकते. त्याबद्दल अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र Xperia Compact हा iPhone Mini ला टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवला जाणार आहे. जो आयफोन मिनी ला बेस्ट अॅन्ड्रॉइड ऑप्शन ठरु शकतो. Sony Xperia Compact मध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याचसोबत शानदार कॅमेरा क्वालिटी देऊ शकते.(Xiaomi Mi 11 Ultra 'या' तारखेला भारतात होणार लाँच, हा स्मार्टफोन असणार कॅमे-याच्या बाबतीत अव्वल)
तर एक्सपिरिया 1 III संबंधित समोर आलेल्या लीक्समध्ये स्मार्टफोनमध्ये पेरिस्कोप झूम लेन्सचा वापर केला जाणार आहे. हा स्मार्टफोन Snapdrgon 888 प्रोसेसर वर उतरवला जाऊ शकतो. हा 120Hz रिफ्रेश रेटच्या स्क्रिनमध्ये उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये 126GB रॅम आणि 5G कनेक्टिव्हिटी सपोर्ट सुद्धा मिळणार आहे.